Asaduddin Owaisi: "खरा मर्द तोच, जो आपल्या पत्नीची गुलामी करतो": असदुद्दीन ओवैसी

"खरा मर्द तोच असतो, जो आपल्या पत्नीची गुलामी करतो, मी स्वतः याची साक्ष आहे आणि माझी दाढी घरातच पांढरी झाली आहे," असे वक्तव्य एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले.
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiFile Photo
Published on
Updated on

Asaduddin Owaisi

भोपाळ: "खरा मर्द तोच असतो, जो आपल्या पत्नीची गुलामी करतो, मी स्वतः याचा साक्षीदार आहे आणि माझी दाढी घरातच पांढरी झाली आहे," असे वक्तव्य एमआयएमचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले. समान नागरी कायद्याच्या विरोधात भोपाळमध्ये आयोजित एका जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी ओवैसी म्हणाले की, "इथे उपस्थित असलेल्या Gen-Z तरुणांनी हात वर करा." यानंतर त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, "तुम्हीच बदल घडवून आणाल, तुम्ही तुमच्या मशिदी आबादीत ठेवाल, आई-वडिलांची सेवा कराल आणि बहिणींना त्यांचा हक्क मिळवून द्याल."

Asaduddin Owaisi
Iran US War: इराण युद्धामुळे महागाई वाढली, जगभरात संतापाचा उद्रेक; जनता रस्त्यावर, 7 देशांच्या अर्थव्यवस्था संकटात

"तुम्ही तुमच्या पत्नींची गुलामी कराल का?"

ओवैसींनी उपस्थितांना थेट सवाल केला की, "तुम्ही तुमच्या पत्नींची गुलामी कराल का?" त्यांनी हाच प्रश्न वारंवार विचारत उपस्थितांकडून प्रतिसाद घेतला आणि स्पष्ट केले की, यात कसलीही लाज किंवा भीती बाळगण्याचे कारण नाही. "खरा मर्द तोच आहे, जो आपल्या पत्नीची गुलामी करतो," असे ते म्हणाले.

"माझी दाढी घरातच पांढरी झाली आहे"

ओवैसींनी स्वतःचे उदाहरण देत म्हटले, "मी तुमच्यासमोर उभा आहे. माझी दाढी उन्हात पांढरी झालेली नाही, तर ती घरातच पांढरी झाली आहे. माझ्याही घरात पत्नी आहे, दुसऱ्याच्या नाही. माझ्या बहिणींवर कोणताही अन्याय होणार नाही," असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

विशेष म्हणजे, भोपाळमधील ही रॅली समान नागरी कायद्याच्या विरोधात आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान त्यांनी १७ सप्टेंबर रोजी जंतरमंतरवर UCC विरोधात होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे नागरिकांना आवाहन केले.

Asaduddin Owaisi
Mira Bhayandar news: PM मोदींना भेटल्यानंतर जमिनीचा वाद मिटला; वर्गमित्राची जमीन अखेर परत, भाजप आमदाराने सोडला ताबा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news