Amina normal delivery four babies: काय सांगता! अमीनाने ५ दिवसात ४ मुलांना दिला जन्म; सगळ्या नॉर्मल डिलिव्हरी करून इतिहास रचला

Amina normal delivery four babies
Amina normal delivery four babiespudhari
Published on
Updated on

Amina normal delivery four babies: संभळमधील किराना स्टोअर चालवणाऱ्या मोहम्मद आलिम यांचा दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या घरी आता चार बाळांचे आगमन झाले आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नी अमीना यांनी पाच दिवसांमध्ये चार बाळांना जन्म दिला. वैद्यकीय क्षेत्रातील या अभूतपूर्व घटनेमुळं डॉक्टर देखील अवाक झाले. सर्वात आधी ९ मे रोजी पहिल्या मुलाचा जन्म झाला. त्यानंतर गुरूवारी दुसऱ्या मुलाचा आणि दोन मुलींचा जन्म झाला.

Amina normal delivery four babies
Frozen tissue fatherhood | दहाव्या वर्षी गोठवलेल्या ‘उती’मुळे 28 व्या वर्षी होणार पिता

डॉक्टरांसमोर या चार डिलिव्हरी करण्याचे मोठे आव्हान होते. गर्भात चार जीव, आईची प्रकृती बिघडलेली आणि वेळेआधीच प्रसुती वेदना याचे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. डॉक्टरांनी सतत तपासणी आणि नजर ठेवत आई आणि मुलांना सुरक्षित ठेवलं. डॉक्टरांच्या मते ही संपूर्ण वेगळ्या प्रकारची डिलिव्हरी होती. एवढ्या हाय रिस्क डिलिव्हरीमध्ये चार मुलांची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे.

Amina normal delivery four babies
Twins different fathers | जुळी मुलं; पण दोघांचे वडील वेगवेगळे!

वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ घटना

डॉक्टरांच्या मते ही मेडिकल सायन्समधील अत्यंत दुर्मिळ घटना म्हणावी लागेल. डॉक्टरांनी सांगितलं की अमीना जेव्हा गर्भवती झाली तेव्हापासून ती हाय रिस्क श्रेणीतच मोडत होती. दुसऱ्या महिन्यात ज्यावेळी अल्ट्रा साऊंड चाचणी करण्यात आली त्यावेळी त्यांच्या गर्भात चार मुलं वाढत आहेत हे कळालं. सर्व अर्भके ही वेगवेगळ्या पिशवीमध्ये होते. त्यामुळं हे जास्तच संवेदनशील प्रकरण होतं.

सुरूवातीच्या काळात त्यांना फिटल रिडक्शनचा सल्ला देखील देण्यात आला होता. मात्र कुटुंबीयांनी सर्व मुलांना जीवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. गर्भावस्थेच्यावेळी आमीना यांना रक्तदाब आणि लिव्हरसंबंधी समस्या झाल्या. अनेकवेळा त्यांना रूग्णालयात दाखल करावं लागलं.

Amina normal delivery four babies
sperm extraction methods: सैनिक पती कोमात... पत्नीला व्हायचंय आई; स्पर्म घेण्याची मिळाली परवानगी, मात्र हे कसं शक्य होणार?

डॉक्टरांची करडी नजर

डॉक्टरांनी अमीनाची जवळपास दर १५ ते २० दिवसांनी तपासणी केली. यासाठी कुटुंबीय टीएमयू रूग्णालयात येत होते. डॉक्टरांची टीम मुलांच्या वाढीवर नजर ठेवून होती. आठ मे रोजी अमीनाला अचानक प्रसव वेदना सुरू झाल्या. त्यानंतर ९ मे रोजी पहिल्या मुलाचा जन्म झाला. त्या मुलाचे वजन जवळपास ७१० ग्रॅम होते. डॉक्टरांनी वेळेत सर्व नियंत्रणात आणलं आणि पुढच्या डिलिव्हरी थांबवल्या, इतर गर्भ अजून पूर्णपणे परिपक्व झाले नव्हते. त्यानंतर गुरूवारी पुन्हा आमीनाला कळा सुरू झाल्या.

कुटुंबियांनी अमीनाला लगेच रूग्णालयात हलवले. त्यावेळी डॉक्टरांची टीम तयार होती. त्यानंतर एका मुलाचा आणि दोन मुलींचा जन्म झाला. सध्या ही मुलं डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यातील एक मुल सामन्य स्थितीत आहे तर दोन मुलांची विशेष काळजी घेतली जात आहे.

डॉक्टरांच्या मते चार मुलांची प्रेग्नन्सी ही दुर्मिळ आहे. त्यात सर्व मुलांची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे. ही वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठी अचिव्हमेंट आहे. आमीना यांच्या डॉक्टर शुभ्रा अग्रवाल, पूर्ती, रोली आणि डॉक्टर मोनिका यांनी परिस्थितीवर कायम नजर ठेवली होती.

Amina normal delivery four babies
Mumbai Airport Baby Birth: मुंबई विमानतळावर रुग्णवाहिकेतच बालिकेचा जन्म; वैद्यकीय पथकाची तत्परता ठरली जीवनदायी

मुलांच्या कमी वजनाचे आव्हान

अमीनाची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरांच्या टीममधील शुभ्रा अग्रवाल यांनी सांगितलं की या डिलिव्हरीवेळी बाळांचे कमी वजन हे मोठे आव्हान आहे. त्यांचा जन्म वेळेआधी झाला आहे. पहिले बाळ ९ मे रोजी जन्माला आलं त्याचे वजन ७१० ग्रॅम आहे.

डॉक्टरांनी या बाळाला त्वरित एनक्युबेटरमध्ये ठेवलं. इतर तीन मुलांना देखील मॉनिटर केलं जात आहे. डॉक्टरांच्या मते दोन मुलांना अतिरिक्त वैद्यकीय देखभालीची गरज लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news