Twins different fathers | जुळी मुलं; पण दोघांचे वडील वेगवेगळे!

Twins different fathers |
Twins different fathers | जुळी मुलं; पण दोघांचे वडील वेगवेगळे!
Published on
Updated on

न्यूयॉर्क : वैद्यकीय इतिहासात एक विचित्र प्रकरण समोर आल्यामुळे डॉक्टरही चक्रावले आहेत. एक महिलेने दोन पुरुषांच्या मुलांना एकाच वेळी जन्म दिला आहे. या महिलेला जुळी मुलं झाली पण त्यांचे वडील दोन वेगवेगळे पुरुष आहेत. ही घटना आहे कोलंबियामधील. या जुळ्या मुलांच्या जन्मानंतर डॉक्टरही गोंधळात आहेत. या महिलेच्या जुळ्या मुलांचे डीएनए टेस्ट केल्यावर हे धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण जगभरात मेडिकल इतिहासात अशा जवळपास २० केसेस आहेत.

मेडिकल भाषेत या प्रकरणाला ‌‘हेटेरोपॅटरनल सुपरफेकंडेशन‌’ असे म्हटले जाते. हे एक दुर्मीळ प्रकरण असून ज्यामध्ये एकाच महिलेच्या गर्भातून जन्मलेल्या दोन मुलांचे वडील वेगवेगळे असल्याचे डीएनए चाचणीतून समोर आले आहे. पण एकाच वेळी महिला दोन वेगवेगळ्या पुरुषांकडून कशी गर्भवती झालं याबद्दल डॉक्टरांनी सविस्तर सांगितलंय. कोलंबियाच्या राष्ट्रीय विद्यापीठातील संशोधकांनी यांनी दावा केला आहे की, महिलांच्या ओव्हुलेशनच्या वेळी फक्त एकच बीजांड सोडते, पण दुर्मीळ परिस्थितीत कधीकधी दोन बीजांडे किंवा स्त्रीबीजे तयार होतात. अशा स्थितीत जर एखाद्या महिलेने दोन पुरुषांशी कमी काळात लैंगिक संबंध ठेवले.

अशा वेळी दोन्ही बीजांडे वेगवेगळ्या शुक्राणंद्वारे गर्भधारणा होऊ शकते. या विद्यापीठाचा दावा शंभर टक्के खरा आहे. खरंतर ही आश्चर्यचकित आणि तेवढीच दुर्मीळ घटना आहे. पण मेडिकल संशोधन आणि जगात अशी २० प्रकरणांची नोंद झाली आहे. जनुकीय तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, महिलांच्या शरीरात शुक्राणू हे अनेक दिवस जिवंत राहतो. कोलंबियाच्या राष्ट्रीय विद्यापीठातील ‌’लॅबोरेटरी ऑफ पॉप्युलेशन जेनेटिक्स अँड आयडेंटिफिकेशन‌’च्या संशोधकांनी या महिलेसोबत घडलेल्या दुर्मीळ प्रकरणाचा अभ्यास केला.

त्यानंतर त्यांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, वडिलांना मुलांच्या पितृत्वाविषयी शंका निर्माण झाला होती. अशा स्थितीत त्यांनी जुळ्या मुलांची डीएनए टेस्ट केली. जेव्हा ही टेस्ट समोर आली तेव्हा संशोधनकर्त्यांसोबत डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. टेस्टमध्ये असं समोर आलं की, मुलांचे वाय गुणसूत्र वेगवेगळ्या वडिलांच्या गुणसूत्रांशी जुळल्याचे समोर आले. ज्यामुळे या दुर्मीळ प्रकरण ज्याला वैद्यकीय भाषेत हेटेरोपॅटरनल सुपरफेकंडेशन हे समोर आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news