

sperm extraction methods: दिल्ली उच्च न्यायालयाने बराच काळापासून कोमामध्ये असलेल्या भारतीय लष्करातील एका जवानाचे स्पर्म काढण्याची परवानगी दिली आहे. हे शुक्राणू काढून ते सुरक्षित ठेवण्याची आणि सशर्त त्याचा वापर करण्याची परवानगी जवानाच्या पत्नीला देण्यात आली आहे. जवानाच्या पत्नीनेच न्यायालयात आपल्या कोमात असलेल्या पतीचे स्पर्म काढण्याची परवानगी मागितली होती.
तिचे पती २०२५ पासून कोमामध्ये व्हेंटिलेटरवर आहेत. या जवानाच्या पतीने भविष्यात आपल्या पतीच्या स्पर्मचा वापर करून आव्हीएफद्वारे आई होण्याची भावनिक इच्छा व्यक्त केली होती. आता हा निकाल समोर आल्यानंतर लोकांच्या मानत याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. पती कोमात असताना हे असं करणं शक्य आहे का?
इंद्रप्रस्थ अपोलो रूग्णालयातील डॉक्टर नीलम सूरी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोमामध्ये असलेल्या व्यक्तीचे स्पर्म काढणून घेण्याच्या प्रक्रियेला पेरिमॉर्टेल स्पर्म रिट्रीवल असं म्हणतात. याला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मृत्यूपर्वी स्पर्म घेणे असं देखील म्हणतात.
तांत्रिकदृष्ट्या हे शक्य आहे. इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन किंवा सर्जरीद्वारे हे करता येतं. अभ्यासानुसार या मेथर्ड्सचा वापर करून जवळपास १०० टक्के यशस्वीरित्या स्पर्म काढता येतात. तसेच हे स्पर्म जिवंत असण्याची शक्यता ८० ते ९० टक्के असते.
नॉन इनवेसिक
जर रूग्णाचे स्पाईनल रिफ्लेक्स मजबूत असेल तर इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन देऊन ही प्रक्रिया पार पाडली जाते.
सर्जिकल
जर नॉन इनवेसिक पद्धत उपयोगी पडत नसेल तर टेस्टिकुलर स्पर्म एस्पिरेशन (TESA) नावाची एक पद्धत अवलंबली जाते. यात एका बारीक सूईद्वारे थेट अंडकोशातून स्पर्म काढले जातात.
स्पर्म काढल्यानंतर ते क्रायोप्रिझर्व म्हणजेत फ्रीज केले जातात. यानंतर लॅबमध्ये महिलेच्या अंडाणूंसोबत फर्टीलायझेशन केलं जातं. त्याद्वारे भ्रूण तयार केला जातो आणि महिलेच्या गर्भाशयात तो ट्रान्सफर केला जातो.
आपण हे एक्स्ट्रॅक्ट केलेले स्पर्म फ्रीज करण्याची पद्धत १९५३ पासून उपयोगात आणत आहोत. याद्वारे गर्भधारणा होण्याची मेथर्ड ही सुरक्षित आणि मान्यताप्राप्त मानली जाते. आपण हे स्पर्म जवळपास दशकभर फ्रीज करून ठेऊ शकतो.
जाणकारांच्या मते जर एखादा व्यक्ती कोमामध्ये असेल तर त्याची स्पर्म क्वालिटी खराब होते असं नाही. जर त्याच्या स्पर्मची गुणवत्ता चांगली असेल तर ते फ्रीज करून ठेवता येऊ शकतात. मात्र जर रूग्णावर विशिष्ट औषधांचे उपचार सुरू असतील किंवा अँटीबायोटिक्स किंवा लाईफ सपोर्ट उपचार घेत असेल तर त्याच्या स्पर्मची गुणवत्ता आणि संख्या कमी होऊ शकते.