Aircraft fuel rates : विमानाच्या इंधन दरात चार टक्क्यांची वाढ

Aircraft fuel rates : विमानाच्या इंधन दरात चार टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी बुधवारी विमानाच्या इंधन दरात चार टक्क्यांची वाढ केली. पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र सलग दहाव्या महिन्यात जैसे थे ठेवण्यात आले आहेत.

देशाची राजधानी दिल्लीत विमानाचे इंधन अर्थात एटीएफचे दर प्रति किलो लिटरमागे ४४ हजार २१८ रुपयांनी वाढून १ लाख १२ हजार ३५७ रुपयांवर गेले आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून एटीएफ दरात तीनवेळा कपात करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच एटीएफ दरात वाढ झाली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अशा सलग तीन महिन्यांत एटीएफ दरात कपात करण्यात आली होती. हवाई वाहतूक कंपन्यांना त्यांच्या एकूण खर्चापैकी इंधनावर ४० टक्के इतका खर्च करावा लागतो.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news