Budget 2023 : अर्थमंत्र्यांच्या भाषणात ५१ वेळा ‘टॅक्स’, २८ वेळा ‘विकास’ शब्दाचा उल्लेख | पुढारी

Budget 2023 : अर्थमंत्र्यांच्या भाषणात ५१ वेळा ‘टॅक्स’, २८ वेळा ‘विकास’ शब्दाचा उल्लेख

नवी दिल्ली;पुढारी वृत्तसेवा : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात 51 वेळा ‘टॅक्स‘ या शब्दाचा उल्लेख केला तर 28 वेळा ‘विकास‘ या शब्दाचा उल्लेख केला. याशिवाय स्टेट, फायनान्स, योजना, अर्थव्यवस्था, कस्टम ड्युटी, युवा शक्ती, कृषी, हरित विकास यासारख्या शब्दांचा उल्लेख त्यांच्या भाषणात होता. (Budget 2023)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (दि.१) अर्थसंकल्प सादर करत अनेक घोषणा केल्या आहेत. काही वस्तुंचे भाव वधारणार आहेत. तर काही वस्तूंचे भाव कमी होतील. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. समाजातील सर्व घटकांच्‍या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत सरकारच्‍या वतीने राबविण्‍यात येणार्‍या योजनांची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी माहिती दिली.

काही वस्तूंवरील आयात कर वाढण्यात येणार असल्याने या वस्तू महाग होतील. त्यात सोने, चांदी, प्लॅटिनम यांचा समावेश आहे. सिगारेटवरील नैसर्गिक आपत्ती कर (एनसीसीडी) १६ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे ठराविक सिगारेटही महाग होईल. आयात शुल्क वाढण्यात आल्याने इलेक्ट्रिक किचन चिमणीवरील भाव वधारणार असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

हा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांच्या भाषणात ‘राज्य‘ शब्दाचा उल्लेख 27 वेळा झाला. त्याखालोखाल ‘फायनान्स‘ आणि ‘कृषी‘ या शब्दाचा उल्लेख प्रत्येकी 25 वेळा, ‘हाउसिंग‘ शब्दाचा उल्लेख 24 वेळा, ‘योजना‘ शब्दाचा उल्लेख 22 वेळा, ‘इकाॅनाॅमी‘ शब्दाचा उल्लेख 21 वेळा, ‘कस्टम ड्युटी‘ शब्दाचा उल्लेख 20 वेळा, ‘बॅंक‘ शब्दाचा उल्लेख 18 वेळा, ‘डिजिटल‘ शब्दाचा उल्लेख 17 वेळा, ‘क्रेडिट‘ शब्दाचा उल्लेख 17 वेळा, ‘ग्रीन‘ शब्दाचा उल्लेख 16 वेळा तर ‘उत्पादन‘ शब्दाचा उल्लेख 13 वेळा झाला. (Budget 2023)

     हेही वाचलंत का ? 

Back to top button