Air India Boeing 787 Dreamliner : 11 वर्षे जुने ‘बोईंग’... निघाले होते 7000 किमीच्या प्रवासावर! जाणून घ्या विमानाचा तपशील

या प्रकारच्या विमानांचे आयुर्मान तब्बल 30 ते 50 वर्षे किंवा 44000 उड्डाण चक्र इतकी असते. 787-8 हे वाईड-बॉडी, मिड-साइज आणि लॉन्ग-रेंज विमान आहे.
Air India Boeing 787 Dreamliner
Published on
Updated on

ahmedabad plane crash boeing 787 dreamliner fuel efficiency price

गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी (दि. 12) दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर (AI-171) हे विमान लंडनच्या दिशेने निघाले होते, पण टेकऑफनंतर काही मिनिटांतच मेघानीनगर परिसरात कोसळले. या अपघाताने संपूर्ण शहर हादरले, तर आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस आणि रुग्णवाहिका तातडीने दाखल पोहचून बचावकार्य सुरू करण्यात आले.

242 जणांचे स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त

या विमानात एकूण 242 जण होते. यात 230 प्रवासी, 2 वैमानिक आणि 10 केबिन क्रू मेंबर्स. हे विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघाले होते. टेकऑफनंतर काही मिनिटांतच, विमानाने नियंत्रण गमावले आणि एका निवासी इमारतीवर आदळले. या इमारतीत वैद्यकीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह असल्याचे समजते. अपघातानंतर मोठा स्फोट झाला. आगीच्या ज्वाळा दूरवरूनही दिसत होत्या. घटनेचे गांभिर्य लक्षा घेऊन ढिगाऱ्यात अडकलेल्या प्रवाशांना आणि स्थानिकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.

Air India Boeing 787 Dreamliner
Ahmedabad Plane Crash: विमानात किती भारतीय प्रवासी होते? एअर इंडियाची पहिली प्रतिक्रिया, हेल्पलाईन क्रमांकही जारी

11 वर्षे जुने, पण अत्याधुनिक विमान

हे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान साडेअकरा वर्षे जुने होते. या प्रकारच्या विमानांचे आयुर्मान तब्बल 30 ते 50 वर्षे किंवा 44000 उड्डाण चक्र इतकी असते. 787-8 हे वाईड-बॉडी, मिड-साइज आणि लॉन्ग-रेंज विमान आहे. जे 254 प्रवासी घेऊन 13,620 किमीपर्यंत उड्डाण करू शकते. यामध्ये दोन शक्तिशाली इंजिन असतात. त्याची इंधन क्षमता सुमारे 1 लाख 26 हजार 206 लिटर आहे. तर हे विमान 954 किमी/तास कमाल वेगाने प्रवास करते. या विमानाची किंमत सुमारे 21.8 अब्ज रुपये आहे. अहमदाबाद ते लंडन ही सुमारे 7000 किमीची अंतराची फ्लाइट या विमानासाठी अगदी योग्य मानली जाते.

Air India Boeing 787 Dreamliner
Ahmedabad plane crash : 'वैमानिकाचा 'Mayday' कॉल; पण त्यानंतर 'ATC'ला प्रतिसाद नाही'

सुरक्षा आणि तांत्रिक वैशिष्ट्ये

  • कॉकपिटमध्ये अत्याधुनिक सिक्युरिटी सिस्टीम

  • सायबर सिक्युरिटीसाठी विशेष उपाय

  • प्रवाशांची आणि बॅगेजची काटेकोर तपासणी

  • इंटेलिजन्स शेअरिंगद्वारे संभाव्य धोके ओळखण्याची व्यवस्था

  • अधिकृत प्रतिक्रिया आणि पुढील तपास

Air India Boeing 787 Dreamliner
Ahmedabad Plane Crash: लंच ब्रेकसाठी हॉस्टेलमध्ये जेवायला गेला अन् विमान कोसळले; आग लागल्याने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी

सुरक्षा उपाय

  • रिडंडंट सिस्टिम्स : 787-8 विमानात अनेक प्रणाली रिडंडंट (backup) स्वरूपात आहेत, जसे की इंजिन, हायड्रॉलिक आणि इलेक्ट्रिकल सिस्टिम्स. यामुळे जर एखादी प्रणाली निकामी झाली, तरी दुसरी सक्रिय राहते आणि काम करत राहते.

  • अत्याधुनिक नेव्हिगेशन : GPS आणि इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टिम (ILS) यांच्या मदतीने वैमानिकांना अचूक नेव्हिगेशन मिळते.

  • आपत्कालीन प्रक्रिया : क्रू मेंबर्सना नियमितपणे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये आपत्कालीन लँडिंग, आग विझवणे आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हाताळणे यांचा समावेश असतो.

  • साहित्य : 787-8 मध्ये हलक्या वजनाच्या कंपोझिट मटेरियल्सचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे हे विमान अधिक सुरक्षित आणि इंधन कार्यक्षम बनते.

एअर इंडियाने सोशल मीडियावरून अपघाताची माहिती दिली असून, ‘AI-171 फ्लाइट अहमदाबादहून लंडन गॅटविककडे जात असताना अपघातग्रस्त झाली. सर्व संबंधितांना मदत आणि माहिती देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,’ असे यात म्हटले आहे. प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी 1800 5691 444 हा हेल्पलाइन क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.

शहरात शोक आणि चिंता

या अपघातामुळे संपूर्ण अहमदाबादमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कुटुंबांचे स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झाले. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्यातून जिवंत लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक तज्ज्ञ आणि DGCA यांचा तपास सुरू आहे.

एक क्षणात बदललेले आयुष्य

गुरुवारी सकाळी घरातून हसत-खेळत निघालेले प्रवासी, त्यांच्या कुटुंबीयांचे स्वप्न आणि एक सुरक्षित प्रवासाची आशा; हे सर्व एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेले. या दुर्घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news