Ahmedabad Plane Crash: विमानात किती भारतीय प्रवासी होते? एअर इंडियाची पहिली प्रतिक्रिया, हेल्पलाईन क्रमांकही जारी

1800 5691 444 टोल-फ्री क्रमांक : या क्रमांकावर संपर्क साधून अपघाताविषयी अधिकृत माहिती, प्रवाशांच्या सद्यस्थितीबद्दल अद्ययावत माहिती मिळणार
air india plane crash in ahmedabad
Published on
Updated on

अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI171 या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने तातडीने उपाययोजना करत अपघातग्रस्त प्रवाशांच्या कुटुंबीयांना आणि संबंधितांना माहिती देण्यासाठी एक विशेष हॉटलाइन सेवा सुरू केली आहे. 1800 5691 444 हा टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून, या क्रमांकावर संपर्क साधून अपघाताविषयी अधिकृत माहिती तसेच प्रवाशांच्या सद्यस्थितीबद्दल अद्ययावत माहिती मिळवता येणार आहे.

एअर इंडियाने या घटनेबाबत आपल्या अधिकृत X हँडलवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘फ्लाइट AI171, अहमदाबाद-लंडन गॅटविक, आज 12 जून 2025 रोजी एका घटनेत सामील झाले. सध्या आम्ही तपशील जाणून घेत आहोत आणि पुढील अपडेट्स लवकरच airindia.com आणि आमच्या X हँडलवर शेअर करू.’

या अपघातात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन प्रवासी होते. बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन कार्यरत आहे.

  • विमानाने दुपारी 1:38 वाजता (IST) रनवे 23 वरून टेकऑफ केले आणि अवघ्या 5 मिनिटांत मेघानीनगर परिसरात कोसळले. विमान 625 फूट उंचीवर असताना त्याचा सिग्नल गमावला गेला.

  • विमानाने टेकऑफनंतर लगेच मे-डे कॉल जारी केला, जो गंभीर आपत्कालीन स्थिती दर्शवतो. यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क तुटला.

  • प्राथमिक अहवालांनुसार, तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. DGCA ने ब्लॅक बॉक्स आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरच्या आधारे तपास सुरू केला आहे. बोईंग कंपनीचे तांत्रिक पथकही तपासात सहभागी होणार आहे.

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हॉटलाइन क्रमांक 24 तास कार्यरत राहणार आहे. प्रवाशांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत आणि आवश्यक माहिती पुरवण्यासाठी विशेष प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपघातामुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता, एअर इंडिया प्रशासनाने अत्यंत संवेदनशीलतेने आणि तातडीने हे पाऊल उचलले आहे.

या हॉटलाइनच्या माध्यमातून अपघातग्रस्त प्रवाशांच्या नातेवाईकांना धीर देण्याचा आणि त्यांना योग्य माहिती पुरवण्याचा एअर इंडियाचा प्रयत्न आहे. कंपनीने म्हटले आहे की, या दुःखद प्रसंगात ते प्रवाशांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास वचनबद्ध आहेत. अपघातस्थळी मदतकार्य वेगाने सुरू असून, संबंधित शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

एअर इंडियाने आवाहन केले आहे की, ज्या प्रवाशांचे कुटुंबीय किंवा मित्र सदर विमानातून प्रवास करत होते, त्यांनी अधिक माहितीसाठी तात्काळ हॉटलाइन क्रमांक 1800 5691 444 वर संपर्क साधावा. कंपनीकडून वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकृत माहिती प्रसारित केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news