Aadhaar Card Latest News: एका क्लिकवर आधार कार्ड संबधित सर्व माहिती; जाणून घ्या प्रक्रिया

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्क : अद्ययावl तंत्रज्ञानाने मानवी जीवन दिवसेंदिवस सुखकर होताना दिसत आहे. कोणतंही काम करणं सोप होताना दिसतं आहे. घरबसल्या फक्त एका क्लिकवर आपण कोणतीही माहिती मिळवु शकतो. तसेच आपली काही कामेही करु शकतो. आता तुम्हीही आधार कार्ड संबंधितही  माहिती मिळवु शकता तिही एका क्लिकवर. तुम्ही आधार कार्ड संबधित सर्व माहिती घेवू शकता. जाणून घ्या काय प्रक्रिया काय आहे. (Aadhaar Card Latest News)

भारत सरकारकडून नागरिकत्वाचा महत्त्वाचा पुरावा म्हणून आधार कार्डची निर्मिती केली गेली आहे. सरकारी काम असो वा निमसरकारी काम आधार क्रमांक हा आवश्यक असतो. युनिक आयडेंटिफेकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) कडून नेहमी अपडेट होत असते. आता आधार कार्डसंदर्भात आणखी एक मोठी अपडेट माहिती समोर आली आहे. याबाबत यूआयडीएआय कडून (UIDAI) याबाबतची माहिती ट्विट करत देण्यात आली आहे. यूआयडीएआयने आणखी एका ग्राहक सेवेची सुरुवात केली आहे. जी २४/७ सेवेत असणार आहे. हे नविन फिचर एआई/एमएल आधारीत असेललं चॅट बॉक्स अधिक सक्षम केलं गेलं आहे. आधारकार्डधारक आपल्या तक्रारी यामाध्यमातून नोंदवू शकतात. आपल्या आधार पीव्हीसी कार्डची स्थिती तपासू शकतात.

यूआयडीएआय नविन अपडेट

यूआयडीएआयने ट्विट करत आपल्या नविन सेवेची माहिती दिली आहे. या ट्विटनूसार "यूआयडीएआयचा हा नव्या एआई/एमएल आधारित चॅटबॉक्स चांगला संवाद करण्यासाठी उपलब्ध आहे. आधारकार्डधारक याद्वारे आपल्या आधार पीव्हीसी कार्डची स्थिती जाणून घेवू शकतात. आपल्या तक्रारी नोंदवू शकता.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

आधार चॅटबॉक्सच्या माध्यमातून तुम्ही कोणते प्रश्न विचारु शकता

तुम्हाला प्रश्न पडला असेल की आधार चॅटबॉक्सच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारायचे; तर आधार चॅटबॉक्स हे आधार संबधित सर्व विषय, सुविधा, सेवा प्रशिक्षित आहे. व्यक्तीने चॅटबॉक्समध्ये आपल्या समस्या विचारल्यानंतर त्वरीत त्याच उत्तर मिळलं जाणार आहे. ही सुविधा हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. आधार चॅटबॉक्सच्या सेवेचा कसा उपयोग करायचा. यासंबधित काही माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्याचीही सोय केली आहे. कोणते प्रश्न विचारु शकता ते पुढीलप्रमाणे पाहू शकता.

  • आधार नोंदणी कुठे करायची (Where to enrol)?
  • कुठे कसे अपडेट करायचं(How to update)?
  • आधार कसे डाउनलोड करायचे How to download Aadhaar?
  • ऑफलाईन ईकेवाईसी ( e-KYC) म्हणजे काय (What is Offline ekyc)?
  • बेस्ट फिंगर हे काय आहे (What is Best finger)?

Aadhaar Card Latest News : असं सुरु करा चॅटबॉक्स

  • प्रथम यूआईडीएआईच्या वेबसाइट वर जा.
  • मुख्यपृष्ठच्या तळाशी उजव्या कोपऱ्यात 'आस्क आधार' (Ask Aadhar) वर क्लिक करा.
  • 'सुरु करा' यावर क्लिक करा
  • आपला प्रश्न टाईप करा किंवा पेजच्या वरती दिलेल्या सेवांपैकी एक निवडा
  • 'पाठवा' यावर क्लिक करा

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news