आधार कार्डबाबतच्‍या प्रश्‍नांची Aadhaar Mitra देणार मिनिटांमध्‍ये उत्तरे, जाणून घ्‍या सविस्‍तर | पुढारी

आधार कार्डबाबतच्‍या प्रश्‍नांची Aadhaar Mitra देणार मिनिटांमध्‍ये उत्तरे, जाणून घ्‍या सविस्‍तर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आधार कार्ड हा आपल्‍या जगण्‍यातील सर्वात महत्त्‍वाचा दस्‍तावेज आहे. मात्र आपल्या जगण्‍यातील अविभाज्‍य भाग झालेल्‍या आधार कार्डबाबत आपल्‍या मनात अनेक प्रश्‍न आणि तक्रारीही असतात. याचा .विचार करुन भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI ) ‘आधार मित्र’ ( Aadhaar Mitra ) हे नवीन चॅटबॉट सुरू केले आहे. जाणून घेवूया या नवीन सेवेविषयी…

आधार कार्डमध्‍ये तुमचं नाव, तुम्‍ही वापरत असलेला माोबाईल फाोन क्रमांक, जन्‍म तारीख, घराचा पत्ता या माहितीची अपटेड करणे आवश्‍यक असते. मात्र यासाठी नेमका कितीवेळ लागले याबाबत माहिती तत्काळ मिळत नाही. आता चॅटबॉट आधार मित्रच्‍या माध्‍यमातून तुम्‍हाला आधार कार्डची नाोंदणी, अपडेटसाठी लागणारा कालावधी व अन्‍य माहिती तत्‍काळ मिळ‍णार आहे.

Aadhaar Mitra : अशी आहे ‘आधार मित्र’ सेवा…

आधार कार्ड अपडेटबाबत नागरिकांचे अनेक प्रश्‍न व तक्रारी असतात. आता याची उत्तरे आधार मित्र या चॅटबॉटच्‍या
माध्‍यमातून तुम्‍हाला मिळणार आहेत. यासाठी तुम्‍हाला सर्व प्रथम UIDAI च्‍या संकेतस्‍थळावर जावे लागले. या संकेतस्‍थळाच्‍या मेन पेजवर एक निळ्या रंगाचा आयकॅानवर क्लीक करताच तुम्‍हाला आधार मित्र ही सुविधा वापरता येणार आहे. येथे तुम्‍हाला आधार कार्डबाबतचे प्रश्‍न आणि तक्रार टाईप करावी लागेल आधार मित्र हे चॅटबॉट काही मिनिटांमध्‍येच तुम्‍हाला तुमच्‍या प्रश्‍नांची उत्तरे देईल. ही सेवा हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्‍ये उपलब्‍ध आहे. तसेच ‘आधार मित्र’ सेवेचा कसा वापर करावा करावा याचे काही व्हिडिओसुद्धा UIDAI च्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहेत.

१२ भाषांमध्‍ये ‘हेल्‍पलाईन’ सेवाही

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI ) हेल्‍पलाईन नंबरही जारी केला आहे. १९४७ या हेल्‍पलाईन नंबर तुम्‍ही कॅालकरुनआधार कार्ड संदर्भातील तुमच्‍या शंकाचे निरसण करु शकता. मराठी, हिंदी, इंग्रजीसह १२ बारा भाषांमध्‍ये ही सेवा आहे. तसेच तुम्‍ही help@uidai.gov.in या संकेतस्‍थळालाही भेट देवून तुम्‍ही शंका व तक्रारीबाबत विचारणा करु शकता.

हेही वाचा : 

 

Back to top button