११ वेळा कोरोना डोस घेतल्‍याचा दावा करणार्‍या बिहारमधील वृद्धाविरोधात गुन्‍हा दाखल | पुढारी

११ वेळा कोरोना डोस घेतल्‍याचा दावा करणार्‍या बिहारमधील वृद्धाविरोधात गुन्‍हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गेली दोन वर्ष कोरोना विषाणूने आपलं जगणं बदलले आहे. आता तिसर्‍या लाटेसह कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉनचीही प्रचंड चर्चा सुरु आहे. एकीकडे लसीकरणाचा वेग सर्वच राज्‍यांमध्‍ये वाढविण्‍याची चर्चा सुरु असतानाच  ११ वेळ कोरोना डोस घेतल्‍याचा दावा बिहारमधील ८४ वर्षाच्‍या वृद्धाने केला आहे. ब्रम्‍हदेव मंडल असे त्‍यांचे नाव आहे. ११ वेळ कोरोना डोस घेतल्‍याचा दावा करणारे मंडल हे राज्‍यात चर्चेचा विषय ठरले असून, त्‍यांच्‍याविराेधात फसवणुकीचा गुन्‍हा दाखल करण्‍यात अआला आहे.

मी कोरोनाचे ११ डोस घेतले आहेत. त्‍यामुळे माझी गुडघेदुखी पूर्ण थांबली, असा दावा ब्रम्‍हदेव मंडल यांनी केला होता.विशेष म्‍हणे मी एकाच आधार क्रमांक आणि मोबाईल फोनच्‍या नोंदणीवरुनच त्‍यांनी ११ वेळा डोस घेतल्‍याचाही दावा पुरैनी प्रखंड येथील औराय गावाचे रहीवासी ब्रम्‍हदेव मंडल यांनी केला होता. सरकार कोणतीही चौकशी करत नाही. मी माझ्‍या आरोग्‍य चांगले राहण्‍यासाठी डोस घेतले.

डोस कोणत्‍या तारखांना घेतला याची लेखी नोंदही त्‍यांनी ठेवली आहे. तसेच यापुढेही घेण्‍याची इच्‍छा असल्‍यााचेही त्‍यांनी सांगितले होते.
पुरैनी आरोग्‍य विभागाच्‍या अधिकार्‍यांनी मंडल यांच्‍याविरोधात मधेपुरा जुना पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. मधेपुरा पोलिस मंडल यांनी केलेल्‍या दाव्‍याची चौकशी करत आहेत. आता बाराव्‍यांदा लस घेण्‍याचाही त्‍यांनी प्रयत्‍न केला.मात्र तो अपयशी ठरला. आता मधेपुरा जुना पोलिस ठाण्‍यात त्‍यांच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल झाला आहे. आता तब्‍बल ११ वेळा डोस घेतल्‍याचा दावा करणार्‍या मंडल यांची चर्चा संपूर्ण राज्‍यात सुरु आहे.

Back to top button