

पुढारी ऑनलाईन डेस्क :
देशात कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांमध्ये देशात १ लाख ५६ हजार ६३२ नवे रुग्ण आढळले आहेत. ( Covid-19 omicron variant ) शनिवारच्या तुलनेत ही संख्या तब्बल १३ टक्क्यांनी अधिक आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामधील कोरोना संसर्गाची टक्केवारी सर्वाधिक आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आज महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत.
देशात सध्या ५ लाख ९० हजार ६११ कोरोना रुग्ण आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ३२७ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्ण संख्येची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे. ( Covid-19 omicron variant ) आज सायंकाळी साडेवाजता पंतप्रधान मोदी उच्चस्तरीय बैठक घेतील. यामध्ये ते देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजपचे नेते वरुण गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. यांनी याबाबतची माहिती स्वत:च ट्विट करुन दिली. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मी पीलीभीतमध्ये मागील तीन दिवस होतो. मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. चाचणी केल्यानंतर माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. देशात कोरोनाची तिसरी लाट आली असून, आता आम्ही यामध्ये निवडणूक प्रचाराला सामोरे जाणार आहेत. आता निवडणूक आयोगाने उमेदवारांसह कार्यकर्ते यांनाही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालनाची सक्ती करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली होती. आता केजरीवाल हे कोरोनामुक्त झाले असून आज ते पत्रकार परिषदही घेणार आहेत.
हेही वाचलं का?