भारतात मोबाईल नंबरची सुरुवात ६, ७, ८, ९ क्रमांकानेच का हाेते?... जाणून घ्‍या | पुढारी

भारतात मोबाईल नंबरची सुरुवात ६, ७, ८, ९ क्रमांकानेच का हाेते?... जाणून घ्‍या

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोबाईलमुळे आज जग खूप जवळ आले आहे.  सिम कार्डद्वारे चालणाऱ्या मोबाईल फोनमुळे कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा शक्य झाली. सिम कार्ड सुरु केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर मिळतो. भारतातील मोबाईल नंबर १० अंकांचा असतो.

प्रत्येक देशातील मोबाईल नंबरची सुरुवात ही वेगळी असते. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो ही सुरुवात अशी वेगळी का असते. तुमच्या मोबाईल नंबरचे सुरुवातीला अंक +९१ (हा भारत देशाचा कोड आहे) या कोडने ने सुरू होतो त्यानंतर ६, ७, ८ किंवा ९ असे अंक येतात. यामध्ये तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की, सुरुवातीच्या अंकांची सुरुवात ०, १ ने का होत नाही किंवा सुरुवातीला २,३,४ किंवा ५ का नाहीत. भारतातील मोबाईल क्रमांक फक्त ६, ७, ८ आणि ९ या अंकांनी का सुरू होतात याची काही कारणं आहेत.

१ अंकापासून का सुरु होतं नाही मोबाईल नंबर?

१ नंबर पासून सुरु होणारे मोबाईन ख्रमांक शक्यतो सरकारी सेवा देणारे असतात. सरकारी सेवामध्ये पोलिस, अग्निशमन सेवा, रुग्‍णवाहिका या सेवांचा समावेश असताे. या सेवांचे नंबर १ पासून सुरु होतात. त्यामुळे भारतात मोबाईल नंबर १ अंकापासून सुरु होतं नाहीत.

तुम्हाला कोणत्याही सरकारी सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला १ ने सुरू होणारा नंबर डायल करावा लागेल. दुसरीकडे २, ३, ४ आणि ५ ने सुरू होणारे अंक आहेत. महत्त्वाचे म्हणजे, २, ३, ४ आणि ५ ने सुरू होणारे क्रमांक लँडलाइन फोनद्वारे वापरले जातात. त्यामुळेच हे अंक असलेले मोबाइल क्रमांक मोबाइल क्रमांक म्हणून वापरता येत नाहीत.

० क्रमांकाची सुरुवात येथे होते

क्रमांक 0 हा लँडलाइन क्रमांकांसाठी एसटीडी कोड म्हणून वापरला जातो. त्यामुळे भारतात मोबाईल नंबरसाठी त्याचा वापर करता येत नाही. या कारणांमुळे भारतात मोबाईलची संख्या ० ते ५ नसून ६ ते ९ पर्यंत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button