पुढारी ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशसह देशातील विविध राज्यांमध्ये ( up election) पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या तरी जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार नाही, असा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला आहे. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ( up election) प्रचार करण्यासाठी काँग्रेस व्हर्च्युअल रॅलीवर भर देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काँग्रसेने प्रचार सभा रद्द केल्या आहेतच. काँग्रेसने बरेली येथे मंगळवारी विद्यार्थी मॅरेथॉनचे आयोजन केले होते. यावेळी प्रचंड गोंधळ झाला. कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघनही झाले. चेंगराचेंगरीमुळे काही विद्यार्थी जखमी झाले होते. त्यामुळे आता काँग्रेसने वाराणसी आणि आझमगडमध्ये आयोजित मॅरेथॉन स्पर्धाही रद्द केली आहे. या स्पर्धा आझमगड आणि वाराणसीमध्ये अनुक्रमे ५ व ९ जानेवारी रोजी होणार होत्या.
हेही वाचलं का?