Cheteshwar Pujara च्या आक्रमक खेळीवर शार्दुल ठाकूरचे मोठे वक्तव्य...

जोहान्सबर्ग : पुढारी ऑनलाईन
IND vs SA : जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियाने दुसऱ्या डावात २ गडी गमावून ८५ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा (३५) (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (११) नाबाद आहेत. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल ८ आणि मयंक अग्रवाल २३ धावा करून बाद झाले. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाअखेर ५८ धावांची आघाडी घेतली. वाँडरर्सच्या अवघड खेळपट्टीवर सामना चुरशीच्या दिशेने जात आहे. कारण इथे २०० पेक्षा जास्त धावसंख्या उभारणे आव्हानात्मक असल्याचे दिसून आले आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात चांगली केली आहे. पहिला कसोटी सामना टीम इंडियाने जिंकला आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.
वाँडरर्सच्या खेळपट्टीवर खेळाडूंना साथ मिळेल की नाही याची कसलीही शाश्वती देऊ शकत नाही. यामुळे भारताने पहिल्या डावात २०२ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेने २२९ धावा (सर्व बाद) केल्या.
विशेष म्हणजे चेतेश्वर पुजाराने या सामन्यात (IND vs SA) आक्रमक फलंदाजी केली. पुजाराच्या आक्रमक खेळीवर शार्दुल ठाकूरने प्रतिक्रिया दिली आहे. शार्दुल ठाकूरने सात विकेट घेतल्या आहेत. दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) म्हणाला की, पुजाराने चांगली फलंदाजी केली. कोणत्याही फलंदाजासाठी कोणताही असा विशिष्ट संदेश नाही. कारण सर्व अनुभवी खेळाडू आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी रणनिती आणि एक फलंदाजीची शैली आहे. प्रत्येकजण एखाद्या विशिष्ट दिवशी त्यांला जसे वाटते तशी फलंदाजी करतो. आणि मला वाटतं की, पुजाराने कोणतेही दडपण न घेता शॉट्स खेळले.
”पुजाराचा (Cheteshwar Pujara) बळी घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज खूप धडपडत होते. या दरम्यान दक्षिण आफ्रिकेकडून काही चेंडू खराब टाकण्यात आले. याचा पुरेपूर फायदा घेत पुजाराने आक्रमक फलंदाज केली. यावेळी स्पिनरचे कटशॉट खेळण्याची त्याला संधी मिळाली. जेव्हा तो स्पिनर विरुद्ध खेळतो तेव्हा त्याच्याकडे २-४ ब्रेड आणि बटर शॉट्स असतात. तो असाच खेळत राहिला तर धावा नक्कीच येतील,” असेही शार्दुल ठाकूरने म्हटले आहे.
हे ही वाचा :
- Viral video : प्री-वेडिंग फोटोशूट, पोज देताना कपलचा तोल गेला अन् त्यानंतर जे घडलं ते पाहून…
- IND vs SA : टीम इंडियाकडे आता ५८ धावांची आघाडी
Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane helped India recover after they lost their openers.
The duo have added 41 runs at stumps on day two.#WTC23 | #SAvIND pic.twitter.com/Z2EddXWvIH
— ICC (@ICC) January 4, 2022