Nasal Spray Vaccine  : भारत बायोटेकच्‍या ‘नेजल व्‍हॅक्‍सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील परिक्षणाला मंजुरी | पुढारी

Nasal Spray Vaccine  : भारत बायोटेकच्‍या 'नेजल व्‍हॅक्‍सिन'च्या तिसऱ्या टप्प्यातील परिक्षणाला मंजुरी

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाच्‍या नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉनच्‍या रुग्‍णसंख्‍येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यामुळे अनेक राज्‍यांमध्‍ये कडक निर्बंध लादले जात आहे. आता कोरोनासह त्‍याच्‍या नव्‍या व्‍हेरियंटचा मुकाबला करण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरणही सुरु आहे. ड्रग्‍स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ( डीसीजीआय) भारत बायोटेकच्‍या तिसर्‍या टप्‍प्‍यातील ‘नेजल व्‍हॅक्‍सिन’च्‍या ( Nasal Spray Vaccine ) (नाकाव्‍दारे दिले जाणारी लस) ‘ तिसऱ्या टप्प्यातील परिक्षणाला मंजुरी दिली आहे.  तिसऱ्या टप्प्यातील या परिक्षणाबरोबरच भारत बायोटेक बूस्टर डोसचेही परिक्षण आगामी काळात करणार आहे.

कोरोनाची तिसरी लाट व ओमायक्रॉन स्ट्रेनच्या रुग्णांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर कोरोना नियंत्रणात आणण्यासाठीचे प्रयत्न देखील वाढले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारत बायोटेकला ‘नेजल व्‍हॅक्‍सिन’च्‍या ( Nasal Spray Vaccine ) (नाकाव्‍दारे दिले जाणारी लस) ‘ तिसर्‍या फेजमधील ( तिसरा टप्‍पा ) चाचणीला चाचणीला मंजुरी दिली आहे.

ऑगस्‍ट २०२१ मध्‍येच ‘नेजल व्‍हॅक्‍सिन’च्‍या दुसर्‍या फेजच्‍या क्‍लिनिकल ट्रायलला मंजुरी देण्‍यात आली. ही लस कोरोनाविरोधातील लढाईत प्रभावी ठरेल, असा अंदाज वैद्‍यकीय क्षेत्रातील तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केला होता. पहिल्‍या फेजमधील चाचणीवेळी स्‍वयंसवकांना देण्‍यात आलेल्‍या लसीचे परिणाम हा चांगला दिसला होता. प्री क्‍लिनिकल चाचणीतही ही लस सुरक्षित असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते. प्राण्‍यांवर करण्‍यात आलेल्‍या अभ्‍यासात . ‘नेजल व्‍हॅक्‍सिन’ ही ॲटीबॉडीजचा उच्‍च स्‍तर तयार करण्‍यात यशस्‍वी ठरली होती. यावेळीच शास्‍त्रज्ञांनी स्‍पष्‍ट केले होते की, ही लस रुग्‍णाच्‍या म्‍यूकस मैंबरेनचे संरक्षण करेल. पोलिओच्‍या ओरल डोस नुसारच कोरोना नेजल व्‍हॅक्‍सिन असेल.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button