आरोग्य मंत्री मंडाविया यांनी घेतला कोरोना नियंत्रण तयारीचा आढावा | पुढारी

आरोग्य मंत्री मंडाविया यांनी घेतला कोरोना नियंत्रण तयारीचा आढावा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वाढलेली असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी रविवारी विविध राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधीशी चर्चा करीत नियंत्रण तयारीचा आढावा घेतला.

देशातील कोरोनाची एकूण स्थिती, ओमायक्रॉन स्ट्रेन, लसीकरण, आरोग्य क्षेत्राची तयारी, लहान मुलांचे लसीकरण, ऑक्सिजनची उपलब्धता आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोनाच्या विरोधात आपण याआधीही लढाई लढलेली आहे, त्या अनुभवाचा वापर ओमायक्रॉन स्ट्रेनविरुद्ध करावयाचा असल्याचे मंडाविया यांनी बैठकीनंतर सांगितले. प्रयत्न आणि सतर्कता या माध्यमातूनच आपण कोरोनाला हरवू शकतो. पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण यशस्वीपणे करण्यासाठी सर्व राज्यांनी वेगळ्या पथकांची स्थापना करावी, असे निर्देश देण्यात आलेले आहेत, असेही मंडाविया यांनी नमूद केले.

हेही वाचलं का?

 

Back to top button