दुबईच्या राजाच्या राणीचे ३ बॉडीगार्डशी लफडं ! नातं लपवायला कोटींची खैरात अन् महागडा घटस्फोट | पुढारी

दुबईच्या राजाच्या राणीचे ३ बॉडीगार्डशी लफडं ! नातं लपवायला कोटींची खैरात अन् महागडा घटस्फोट

पुढारी ऑनलाईन डेस्क

दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांना त्यांची सहावी पत्नी राजकुमारी हया बिंत अल हुसेन हिच्यावर अत्याचार करणे चांगलेच महागात पडले आहे.

ब्रिटनच्या एका न्यायालयाने शेख मोहम्मद यांना घटस्फोटासाठी सुमारे 5500 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. हा पैसा राजकुमारी हया आणि तिच्या दोन मुलांसाठी जाईल. राजकुमारी हया ब्रिटिश अंगरक्षक रसेल फ्लॉवरच्या प्रेमात पडली होती आणि लंडनला पळून गेली होती. आता या घटस्फोटाची चर्चा होत आहे. चला जाणून घेऊया या शाही घटस्फोटाची संपूर्ण कहाणी.

दुबईच्या राजाची राणी, ३ बॉडीगार्डशी लफडं

रिपोर्ट्सनुसार, जवळपास १६ वर्षे लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर तिने २०१८ मध्ये दुबई सोडली आणि गुपचूप आपल्या मुलांसह लंडनला पळून गेली. शेख मोहम्मद बिन रशीद यांनी पत्नी राजकुमारी हया यांच्यावर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.

दुबईचा राजा वादग्रस्त इस्रायली सॉफ्टवेअर पेगाससच्या माध्यमातून राजकुमारी हयाची हेरगिरीही करत असे. दरम्यान, राजकुमारी हयाने बॉडीगार्डसोबत अफेअर समोर आल्यानंतर तिने त्याच्या मदतीने देश सोडला होता. हयाच्या बॉडीगार्डचे लग्न झाले होते पण अफेअरमुळे बॉडीगार्डचे लग्न मोडले. असे म्हटले जाते की, हयाचे तीन बॉडीगार्डसोबत अनैतिक संबंध होते.

दुबईच्या राजाची राणी, ३ बॉडीगार्डशी लफडं

राजकुमारी हयाने तिचे प्रेमसंबंध लपवण्यासाठी १२ कोटी दिले

राजकुमारी हयाने दुबई सोडली असून अनेक वर्षांपासून ती ब्रिटनमध्ये राहत आहे. दुबईच्या शासकाने फेब्रुवारी 2019 मध्ये राजकुमारी हयाला शरिया कायद्यानुसार तिला न सांगता घटस्फोट दिला. यानंतर राजकुमारी हयाने मुलांच्या ताब्यासाठी ब्रिटनच्या न्यायालयात खटला दाखल केला आणि निर्णय हयाच्या बाजूने आला.

शेख मोहम्मद यांना एकूण १६ मुले आहेत. एका रिपोर्टनुसार, राजकुमारी हयाने बॉडीगार्डसोबतचे नाते लपवण्यासाठी १२ कोटी रुपये खर्च केले होते. राजकुमारी हया अंगरक्षकांना महागड्या भेटवस्तू देत असे. तिला ही गोष्ट लपवायची होती पण तसं होऊ शकलं नाही.

ब्रिटनच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या आधारे, राजकुमारी आणि बॉडीगार्ड यांच्यातील अफेअर २०१६ मध्ये सुरू झाल्याचे उघड झाले. यानंतर तो पूर्णपणे राजकुमारी हयासाठीच जीव लावून काम करू लागला. रिपोर्टनुसार, ४६ वर्षीय राजकुमारी हयाचे ३७ वर्षीय ब्रिटिश बॉडीगार्ड रसेल फ्लॉवरसोबतचे अफेअर सुमारे दोन वर्षे चालले.

Princess Haya: Dubai ruler had ex-wife's phone hacked, High Court rules | Tatler

आता एका ब्रिटीश न्यायालयाने दुबईच्या शासकाला घटस्फोटाची नुकसानभरपाई म्हणून माजी पत्नी आणि त्यांच्या मुलांना £550 दशलक्ष देण्याचे आदेश दिले आहेत. यूकेच्या इतिहासातील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक म्हणून याचे वर्णन केले जात आहे. भारतीय रुपयात ही रक्कम ५५१०४४४६५९५ आहे.

राजकुमारी हया बिंत अल-हुसेन यांना २५१.५ पौंड दशलक्ष

लंडन उच्च न्यायालयाने सांगितले की शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी त्यांची सहावी पत्नी राजकुमारी हया बिंत अल हुसेन यांना £251.5 दशलक्ष देणे आवश्यक आहे. याशिवाय, त्याची मुले, 14 वर्षीय अल जलिला आणि नऊ वर्षांचा झायेद यांना £29 दशलक्ष बँक हमी अंतर्गत पैसे द्यावे लागतील.

Dubai ruler's wife who shattered perception of a perfect couple | Dubai | The Guardian

अशा स्थितीत एकूण रक्कम ५५ दशलक्ष पौंड होते. न्यायालयाने सांगितले की मुलांना मिळणारी एकूण रक्कम £29 दशलक्षपेक्षा जास्त किंवा कमी असू शकते. ते किती काळ जगतात आणि ते त्यांच्या वडिलांशी समेट करतात की नाही यासारख्या विविध घटकांवर ते अवलंबून असते. शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम, 72, हे संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधानही आहेत.

हे ही वाचलं का ?

Back to top button