

कोलकाता : पुढारी ऑनलाईन
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभूत करुत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपले वर्चस्व कायम राखले होते. आता कोलकाता महापालिका निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोलकाता महापालिका निवडणूक निकाल येण्यास सुरुवात झाली असून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसचे ७ उमेदवार विजयी झाले असून १४४ प्रभागांपैकी १३३ प्रभागामध्ये तृणमूलचे उमेदवार आघाडीवर आहेत. ४ प्रभागात डावे आघाडीवर असून भाजप केवळ ३ प्रभागात आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि अन्य प्रत्येकी दाेन जागांवर आघाडीवरआहेत.
१९ डिसेंबर रोजी कोलकाता महानगरपालिका निवडणुकीसाठी ६४ टक्के मतदान झाले होते. आज सकाळपासून४ हजार ९५९ केंद्रांवर मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीपासून तृणमूल काँग्रेसने आघाडी घेतली.
.तृणमूलने निर्विवाद आघाडी घेतल्यानंतर पक्ष प्रमुख ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे की, पक्षाने काेलकाता शहरात केलेल्या कामाचा हा विजय आहे. आज काेलकाता हे देशातील एक सुरक्षित शहरांपैकी एक आहे. शहर विकासात आघाडी घेतल्याने मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे.
हेही वाचलं का?