Market Update : शेअर बाजार सावरला, सेन्सेक्सची मजबूत सुरुवात

Market Update : शेअर बाजार सावरला, सेन्सेक्सची मजबूत सुरुवात
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन डेस्क

Market Update : आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी भारतीय शेअर बाजारात हाहाकार उडाला होता. पण मंगळवारी सकाळी बाजाराची सुरुवात मजबूत झाली. मंगळवारी सकाळच्या सत्रात शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७०० अंकांनी वर जाऊन ५६,५२९ अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टीनेही २०० अंकांनी उसळी घेतली.

जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळत असल्याचे चित्र शेअर बाजारात दिसून येत आहे. काल सोमवारी दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये जोरदार घसरण झाली होती. जागतिक पातळीवरील तसेच देशांतर्गत प्रतिकूल वातावरण बाजाराला मारक ठरले. विक्रीच्या सततच्या मार्‍यापोटी बहुतेक सर्व प्रमुख कंपन्यांची मोठी घसरण झाली होती. ओमायक्रॉनबाबतची वाढती चिंता बाजाराला मारक ठरली. या सत्रात बँकिंग कंपन्या, धातू उद्योग आणि स्थावर मिळकत उद्योगांची लक्षणीय घसरण झाली होती.

Market Update : कमकुवत जागतिक संकेत आणि ओमायक्रॉन धास्तीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराचा सेन्सेक्स (Sensex) सोमवारी (दि.२०) सकाळच्या सत्रात सुरुवातीलाच तब्बल १०४० अंकांनी कोसळला होता. निफ्टी देखील ३०० हून अधिक अंकांनी खाली आला. त्यानंतर सेन्सेक्सची ही घसरण सुरुच राहिली होती. बाजार बंद होताना सेन्सेक्सची ११८९.७३ अंकांनी घसरण होऊन तो ५५,८२२ अंकांवर स्थिरावला होता.

पाश्चिमात्य देशांत कोरोनाच्या ओमायक्रॉनची वाढती रुग्णसंख्या आणि जागतिक बाजारपेठेतील कमजोरीचे सोमवारी भारतीय शेअर बाजारात पडसाद उमटले. बाजारातील घसरणीमुळे सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांना १५ मिनिटांत तब्बल ५.१९ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. त्यानंतर घसरण कायम राहिल्याने गुंतवणूकदारांना एकूण ९ लाख कोटींहून अधिक आर्थिक फटका बसला होता.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : बघूया चायनीज डोसे कसे बनतात? | Chinese Dosa Recipe

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news