Beed Monkey Revenge : बीडमध्‍ये माकडांचा 'धिंगाणा', जगभरातील माध्‍यमांनी घेतली दखल | पुढारी

 Beed Monkey Revenge : बीडमध्‍ये माकडांचा 'धिंगाणा', जगभरातील माध्‍यमांनी घेतली दखल

पुढारी ऑनलाईन वृत्तसेवा : सध्‍या साेशल मीडियावर चर्चा आहे ती बीड जिल्‍ह्यातील माकड आणि कुत्रा संघर्षाची. आता या घटनेची दखल जगभरातील माध्यमांनी घेतली आहे.बीड जिल्ह्यातील माझलगाव तालुक्यातील लवूळ येथे २५० कुत्र्यांच्या पिलांची हत्या करणार्‍या दोन वानरांना पकडण्यात आले आहे. या वानरांना जवळच्या जंगलात सोडण्यात येणार आहे.

माझलगाव तालुक्याच्या ठिकाणापासून१० कि.मी अंतरावर असणार्‍या लवूळ गावच्या (Beed Monkey Revenge) परिसरातील २५० कुत्र्यांच्या पिलांची हत्या दोन वानरांनी केल्याची घटना समोर आल्‍याने एकच खळबळ माजली. या घटनेची दखल राज्‍य, देशासह जगातील अनेक देशातील माध्‍यमांनी घेतली आहे.

बीड जिल्ह्यातील माझलगाव तालुक्यातील लवूळ हे जेमतेम पाच ते सहा हजार लोकसंख्येचे गाव. या गावात माकडांच्या एका टोळीने धिंगाणा सुरु केला.  गावातील दिसेल त्या कुत्र्यावर  ही माकड हल्‍ला करत हाेते.(Beed Monkey Revenge) त्या कुत्र्यांना घेवून झाडावर, घराच्या छतावर किंवा एखाद्या उंचीच्या ठिकाणी घेवून वरून टाकून देत. अशा पध्दतीने आतापर्यंत या टोळीने आतापर्यंत सुमारे २५० च्या आसपास कुत्र्यांचा जीव घेतला आहे.  या धक्कादायक आणि विचित्र कृत्याने लवूळ ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. या टोळीने ग्रामस्थांवरही प्राणघातक हल्ले केले आहेत.

Beed Monkey Revenge गॅंगवारची चर्चा

माकडांच्या टोळी कुत्र्यांना का टारगेट करत आहे याचा शोध घेतला असता एक बाब लक्षात आली की, गावातील एका कुत्र्याने या टोळीतील माकडाच्या एका  पिल्लावर हल्ला करून त्याला ठार केले होते. याचा सूड घेण्‍यासाठी माकडांनी  तब्बल २५० आसपास कुत्र्यांचा जीव घेतला आहे. माकड आणि कुत्र्यांच्या या गॅंगवारची भलतीच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. उच्छाद माजवणार्‍या या माकडांना वनविभाग कर्मचार्‍यांनी सापळा रचून जेरबंद केले आहे.

जगभगातील माध्यमांनी नोंद

माकडांच्या टोळीच्या या धक्कादायक कृत्याची दखल स्थानिक ते जगभरातील माध्यमांनी घेतली आहे. माकड आणि कुत्र्यांच्या  गॅंगवारची  इनसायडर (INSIDER), द सन (The SUN), न्यूयाॅर्क पोस्ट (NEW YORK POST), Al-Mayadeen Media Network, nzherald.co.nz माध्यमांनी या घटनेची दखल घेतली आहे.

पाहा व्‍हिडीओ : महाराष्ट्राचं वैभव दाजीपूर-राधानगरी अभयारण्य!

Back to top button