पीएम किसान : नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी 'ई-केवायसी' सक्‍तीचे | पुढारी

पीएम किसान : नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी 'ई-केवायसी' सक्‍तीचे

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : देशातील लाखो शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या दहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्‍वाची सूचना करण्‍यात आली आहे.

पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर असं सांगण्यात आलं आहे की, “पीएम किसान याेजनेचा लाभ घेणार्‍या शेतकऱ्यांनी कृपया ई-केवायसी (eKYC) पूर्ण करणे अनिवार्य आहे. आधार कार्ड ओटीपी प्रमाणीकरणासाठी फार्मर काॅर्नरमधील ई-केवायसी नावाच्या पर्यायावर क्लिक करा. त्याचबरोबर बायोमेट्रीक प्रमाणीकरणासाठी जवळच्या सीएससी केंद्राला भेट द्या.”

…अशी करा ई-केवायसी पूर्ण

१) सर्वात पहिल्यांदा https://pmkisan.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
२) त्यानंतर उजव्या बाजूला असणाऱ्या ‘Farmers Corner’ या पर्यायावर क्लिक करा.
३) त्यामध्ये e-KYC नावाच्या पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आधार नंबर प्रमाणीकरणाचे पेज ओपन होईल.
४) त्यानंतर आधार क्रमांक या बाॅक्समध्ये तुमचा आधार क्रमांक घाला. तसेच इमेज टेक्स्ट कोड घालून सर्च करा.
५) त्यानंतर तुम्हाला आधार कार्डाशी लिंक असणारा मोबाईल क्रमांक घालावा आणि तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल.
६) तो ओटीपी क्रमांक घालून पीएम किसानचे ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्या.

Back to top button