रेल्वे डब्यांतही आता महिलांसाठी राखीव सीट

रेल्वे डब्यांतही आता महिलांसाठी राखीव सीट

नवी दिल्ली :  महिला प्रवाशांना आता रेल्वेच्या प्रत्येक डब्यात राखीव सीटची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मेल तसेच एक्स्प्रेस ट्रेनच्या स्लीपर डब्यात 6 बर्थ महिलांसाठी राखीव ठेवले जातील. गरीब रथ, राजधानी, दुरंतो तसेच वातानुकूलित एक्स्प्रेस ट्रेनच्या थर्ड एसी डब्यात 6 बर्थ महिलांसाठी राखीव असतील. स्लीपर डब्यात 6 लोअर बर्थ, थर्ड एसीत 4 लोअर बर्थ आणि सेकंड एसी डब्यात 4 लोअर बर्थ (ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांहून अधिक वय असलेली महिला, गर्भवती महिला) राखीव ठेवले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news