खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत 'एफआयआर' दाखल | पुढारी

खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत 'एफआयआर' दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात दिल्लीतील मांडवली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका खाजगी मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार संजय राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांवर अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. यानंतर भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सरचिटणीस दीप्ती रावत भारद्वाज यांनी याप्रकरणी मंडवली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा अपमान होत आहे. अस भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सरचिटणीस दीप्ती रावत भारद्वाज यांनी तक्रारीत म्हटलं आहे. त्यांनी मुलाखतीचा व्हिडिओही पोलिसांनी दिला आहे. तपासाअंती पोलिसांनी रविवावर आयपीसी कलम 500 आणि 509 (बदनामी आणि अपशब्द वापरणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास मांडवली पोलीस करत आहेत.

दीप्ती रावत भारद्वाज यांनी सांगितले की, गुरुवारी ( दि. 9 )  एका वृत्तवाहिनीवर  शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक मुलाखत दिली. यावेळी त्‍यांनी  भाजप कार्यकर्त्यांवर अशोभनीय टिप्पणी केली. त्‍यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचा अपमान करण्यात आला. यासंदर्भात मांडवली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.

हेही वाचलंत का?

 

Back to top button