पुढारी ऑनलाईन डेस्क :
भाजप देशाला उलट्या बाजूने नेत असल्याचे शरद पवारांनी 1996 मध्ये सांगितले होते. ती भविष्यवाणी अआता खरी ठरत आहे. 25 वर्षांपूर्वी त्यांनी हेही सांगितले होते की, भाजपला देश एकसंघ नको आहे. आणि हे आम्हाला दोन वर्षापूर्वी समजले आहे., अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त आज मुंबईत "नेमकचि बोलणे " या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यात ते बाेलत हाेते. शरद पवारांची सन 1988 ते 1996 च्या काळातील गाजलेली काही निवडक भाषणे या पुस्तकाच्या रूपाने सर्वांसमोर आणण्यात आली आहेत. या वेळी खासदार शरद पवार यांच्यासह खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, डॉ. सुधीर भोंगळे, विजय केळकर, रंगनाथ पठारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संजय राऊत म्हणाले, राजकारणाचा गाढा अभ्यास असणारे, विकासाची दुरदृष्टी असणारे, देशातील जनतेला हिम्मत देणारे तसेच महाराष्ट्राची अस्मिता सर्वदूर जपणारे शरद पवारांसारखे नेतृत्व आपल्याला लाभले हे भाग्यच आहे. महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार बेरंग नाही, हे विरोधी पक्षाने ध्यानात घ्यावे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी संसद आवारात शरद पवारांना आपण का खुर्ची दिली याचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी पवार साहेबांच्या ६० भाषणाचे हे पुस्तक जरूर वाचावे तसेच हे पुस्तक पंतप्रधानांनाही पाठवायला हवे, असा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचलं का?