EPFO : तुमच्या PF अकाउंटमधून भरु शकता LIC प्रीमियम, जाणून घ्या काय आहे सुविधा | पुढारी

EPFO : तुमच्या PF अकाउंटमधून भरु शकता LIC प्रीमियम, जाणून घ्या काय आहे सुविधा

पुढारी ऑनलाईन डेस्क

जीवन विमा पॉलिसी (Life Insurance Policy) चा प्रीमियम वेळत भरला नाही तर विमा कव्हर संपण्याचा धोका असतो. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. या काळात उद्योग ठप्प झाले होते. यामुळे अनेकांना विमा पॉलिसीचा प्रीमियम भरण्यास अडचणी आल्या. पण आता प्रीमियम भरण्याचा सुरक्षित पर्याय आहे. तो म्हणजे तुम्ही LIC चा प्रीमियम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) अकाउंटमधून भरु शकता. EPFO ने काही अटींवर ईपीएफ खात्यातून एलआयसी प्रीमियम भरण्याची मूभा दिली आहे.

जीवन विमा पॉलिसी आणि EPF हे दोन्ही आर्थिक अडचणीच्या काळात कामी येतात. या दोन्हींमध्ये गुंतवणूक करण्यामुळे इन्कम टॅक्स (Income Tax) च्या सेक्शन 80C नुसार सूट मिळते.

आर्थिक अडचणीच्या काळात EPF मधून LIC प्रीमियम भरण्याचा पर्याय निवडला पाहिजे. ईपीएफओ मधून एलआयसी प्रीमियम भरण्याची परवानगी आहे. पण त्यासाठी काही अटी पूर्ण करायला हव्यात. त्यासाठी काय आहेत या अटी जाणून घेऊयात…

  1. आपल्या EPF खात्यात कमीत कमी एलआयसीचे दोन प्रीमियम भरता येईल एवढी रक्कम हवी.
  2. EPF आणि LIC पॉलिसी नंबर लिंक करायला हवा. त्यानंतर EPFO ला फॉर्म १४ भरून द्यायला हवा. हे एकप्रकारचे परमिशन लेटर असते. यातून आपल्याकडून ईपीएफओला एलआयसी भरण्यासाठी परवानगी दिली जाते. त्यानंतर LIC प्रीमियमची रक्कम निश्चित तारखेला EPF खात्यातून कट होते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : एसटी कर्मचारी संपावर आहेत ठाम, पण जेवणाचे होतायेत हाल ! |ST employee Strike

Back to top button