Gold Price update : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, तपासा प्रति तोळ्याचा भाव | पुढारी

Gold Price update : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, तपासा प्रति तोळ्याचा भाव

मुंबई; पुढारी ऑनलाईन डेस्क

Gold Price update : सराफा बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. दरम्यान, आज शुक्रवारी (दि.१० डिसेंबर) शुद्ध सोन्याच्या दरात घसरण झाली. काल गुरुवारी (९ डिसेंबर) २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ४७,९६८ रुपयांवर (प्रति तोळा) गेला होता. तो आज १३२ रुपयांनी कमी होऊन ४७,८३६ रुपयांवर आला. चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.

इंडियन बुलियन आणि ज्वेलर्स असोशिएशनच्या माहितीनुसार, Gold Price update सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,८३६ रुपयांवर खुला झाला. तर २३ कॅरेट सोन्याचा दर ४७,६४४ रुपये एवढा आहे. तर २२ कॅरेट सोने ४४ हजारांच्या खाली आले आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४३,८१८ रुपये आहे. १८ कॅरेट सोने ३५,८७७ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,९८४ रुपये आहे. चांदीचा प्रति किलो दर ६०,०९४ रुपयांवर आला आहे. (हे शुक्रवार दि. १० डिसेंबर दुपारपर्यंतचे अपडेटेड दर आहेत)

gold
gold file photo

शुद्ध सोन्याची पारख कशी कराल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

Gold Price update एमसीएक्सवर सोने ४८ हजारांच्या खाली…

एमसीएक्सवर (MCX) सोने ४८ हजारांच्या खाली व्यवहार करत आहे. तसेच एमसीएक्सवर चांदीचा भाव सलग तिसऱ्या दिवशी घसरला. चांदीच्या भावात तीन दिवसांत १.७५ टक्के घट झाली आहे.

हे ही वाचा 

पहा व्हिडिओ : कोल्हापुरी साज बनतो तरी कसा? चला पाहूया | Kolhapuri Saaj

Back to top button