गत सात वर्षात 2783 विदेशी कंपन्यांनी गुंडाळला गाशा : व्‍यापार मंत्री पियुष गोयल

गत सात वर्षात 2783 विदेशी कंपन्यांनी गुंडाळला गाशा : व्‍यापार मंत्री पियुष गोयल

नवी दिल्ली :  पुढारी वृत्तसेवा
मागील सात वर्षाच्या कालावधीत देशातून 2783 विदेशी कंपन्यांनी गाशा गुंडाळला असल्याची माहिती केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी संसदेत दिली. देशात सध्या 12 हजार 500 विदेशी कंपन्या उपकंपन्यांच्या (सब्सिडियरी) माध्यमातून काम करीत असल्याचेही व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी लिखित उत्तरात सांगितले आहे.

मागील सात वर्षात ज्या कंपन्यांनी गाशा गुंडाळला आहे, अशा कंपन्यांत संपर्क कार्यालय अर्थात लायसन ऑफिस, शाखा कार्यालय, प्रकल्प कार्यालय आदी प्रकारे नोंदणीकृत झाल्या होत्या. व्यवसायिक उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अथवा मूळ कंपनीत विलिनीकरण झाल्यानंतर या कंपन्या बंद झाल्या. याशिवाय इतर कारणांमुळे देखील कंपन्या बंद करण्यात आल्या असल्याचे गोयल यांनी नमूद केले.

सात वर्षाच्या कालावधीत 10 हजार 756 विदेशी कंपन्यांनी भारतात कामकाजास सुरुवात केली आहे. या कंपन्यांच्या नोंदणीकरणानंतर देशात नोंदणीकृत असलेल्या विदेशी कंपन्यांची संख्या 12 हजार 458 वर गेली आहे. विशेष म्हणजे व्यापार सुलभतेत (ईज ऑफ डूइंग बिजनेस) भारत 63 व्या क्रमांकावर आहे. गत सात वर्षात भारताने या रँकिंगमध्ये आपली कामगिरी 79 अंकाने सुधारली आहे.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news