अभिनेत्री सामंथा म्हणाली, मी सगळे सहन केले; पण गर्भपात, अफेअर…

अभिनेत्री सामंथा म्हणाली, मी सगळे सहन केले; पण गर्भपात, अफेअर…
Published on
Updated on

नाग चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आता चांगलीच ट्रोल होऊ लागली आहे. मात्र, तिच्यावर अनेक आरोप होऊ लागल्याने तिने मौन सोडले आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहिली असून मी संधीसाधू आहे, मला मूल नको होते, असे अनेक आरोप झाले. आता मी गर्भपात केला, माझे अफेअर होते, असेही बोलले जाऊ लागले आहे; पण घटस्फोटाची प्रक्रिया खूप कठीण आहे. मी कठीण काळातून जात आहे. मला वेळ द्या, अशी विनंती तिने चाहत्यांनी केली आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूड आणि वेब सीरिजमध्ये तिने दमदार अभिनय केला आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या फॅमिली मॅन या वेब सिरीजमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली. मात्र, तिने नाग चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत अनेक कमेंट केल्या आहेत. सोशल मीडियावर तिने घटस्फोटाची पोस्ट लिहिल्यानंतर तिच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

चार वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. घटस्फोट घेतल्यानंतर समंथावर अफेअर्स आणि गर्भपातासारखे आरोप करण्यात आले. या पार्श्वभूमीवर समंथाने आपल्या मुलाखतीत खुलासे केले. तसेच तिने नाराजीही व्यक्त केली.

मला सावण्यासाठी थोडा वेळ द्या

सामंथा म्हणाली, 'आमच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहते नाराज झाले हे मी मान्य करते, मात्र, त्यांची नाराजी व्यक्त करण्याची माझ्या जिव्हारी लागली आहे. ही पद्धत थोडी वेगळी असती तर बरे झाले असते. मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांत मतभेद असू शकतात. मी जशी आहे तशी चाहत्यांनी मला स्वीकारावे असे नाही. माझ्या काही गोष्टी खटकू शकतात. पण ती व्यक्त करण्याची पद्धत थोडी वेगळी हवी.'

आगामी वर्षात काय प्लॅन केलेत असे तिला विचारले असता ती म्हणाली, '२०२१ मध्ये माझ्या खासगी आयुष्यात जे काही घडले, ते पाहता मी फारशी उत्सुक नाही. मला येणाऱ्या नवीन वर्षाकडून काहीच अपेक्षा नाहीत. मी जे काही काळजीपूर्वक नियोजन केले होते, ते सगळे उद्ध्वस्त झाले. आता मी कुठल्याही वादळासाठी तयार आहे. परिस्थितीला खंबीरपणे सामोरी जाणे इतकेच माझ्या हातात आहे.

चाहत्यांनी केलेल्या ट्रोलबाबत ती म्हणाली, 'ते म्हणतात, माझं अफेअर होतं, मला मूल नको म्हणून गर्भपात केला, मी संधीसाधू आहे आणि आता तर मी गर्भपात केला आहे अशीही टीका होत आहे. माझ्या खासगी आयुष्यावर होणारे हे शाब्दिक हल्ले वाईट आणि त्रासदायक आहेत. मला सावण्यासाठी थोडा वेळ द्या.' असेही ती म्हणाली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news