NEET 2024 : नीट पेपरफुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार, एनटीएला नोटीस

NEET 2024 : नीट पेपरफुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार, एनटीएला नोटीस
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा:  नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि इतर गोंधळाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र आणि राष्ट्रीय चाचणी संस्थेला (एनटीए) नोटीस बजावली आहे. या नोटीशीतून पेपरफुटीच्या आरोपांबाबत दोन आठवड्यांच्या आत उत्तर मागविण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुलैरोजी निश्चित केली आहे. NEET 2024

NEET 2024 : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरण नेमकं काय आहे?

  • ग्रेस गुण मिळालेल्या १५६३  विद्यार्थ्यांची २३ जून रोजी फेरपरीक्षा
  • विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र निवडीसाठी प्रत्येकी १० लाख रुपये लाच दिल्याचा गंभीर आरोप
  • सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुलैरोजी

यासंदर्भात हितेश सिंग कश्यप यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. कर्नाटक, ओडिशा, झारखंड आदी राज्यांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र निवडीसाठी प्रत्येकी १० लाख रुपये लाच दिल्याचा गंभीर आरोपही याचिकेतून करण्यात आला आहे. या प्रकरणात परीक्षा केंद्रावर ड्युटी करणाऱ्या ५ शिक्षकांना अटक झाली आहे.  त्यांनी चौकशीत २५ विद्यार्थ्यांबाबत माहिती दिली असल्याचेही याचिकेत नमूद आहे. NEET 2024

दरम्यान, नीट परीक्षेतील फेपरफुटी आणि ग्रेस गुणांच्या गोंधळाविरुध्द देशातील विविध उच्च न्यायालयात ७ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याच्या मागणीसाठी  एनटीएनेही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने संबंधितांना नोटीस जारी केली आहे. त्यावर ८ जुलैरोजी सुनावणी होणार असल्याचे खंडपीठाने सांगितले.

 त्या १५६३ विद्यार्थ्यांना एनटीएने पाठविला ई-मेल

ग्रेस गुण मिळालेल्या १५६३  विद्यार्थ्यांची २३ जून रोजी फेरपरीक्षा घेण्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याबाबत सर्व विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे संपर्क साधून कळविण्यात आल्याची माहिती एनटीएने न्यायालयात दिली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news