‘नीट’ परीक्षा पुन्हा घेण्यासाठी जंतर मंतरवर सत्याग्रह आंदोलन

NEET Exam
NEET Exam

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नीट परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळ परिस्थितीच्या विरोधात गुरूवारी (दि.13) विद्यार्थी, पालक आणि वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी दिल्लीतील जंतर मंतरवर 'नीट सत्याग्रह आंदोलन' सुरू केले आहे. (NEET Examination)

राष्ट्रीय चाचणी संस्थेची (एनटीए) सीबीआय चौकशी करावी. तसेच संपूर्ण नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटला होता, असा आरोप प्राप्ती दत्त या विद्यार्थीनीने या दरम्यान केला. परीक्षेतील गैरप्रकाराबाबत पटना आणि गुजरातमध्ये दहा ते पंधरा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती तिने सांगितली. (NEET Examination)

यावर्षी असंख्य विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे आहेत, असे एका आंदोलनकर्त्या विद्यार्थ्याने सांगितले. पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्यात एनटीए संस्था अपयशी ठरली. दरम्यान शिक्षणमंत्री या संस्थेला क्लीन चीट देत असल्याबद्दल विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केला. (NEET Examination)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news