NDA
NDA

NDA आज सरकार स्थापनेचा दावा करणार, सकाळी 11 वाजता सर्व खासदारांसोबत बैठक

Published on

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आज एनडीएचे खासदार सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. याआधी सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला एनडीएचे सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार बनवण्यासाठीच्या हालचाली गतीमान झाल्‍या आहेत. एनडीएच्या घटक पक्षांची आज एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत एनडीएचे सर्व खासदार सहभागी होणार आहेत. एनडीएच्या या खासदारांची बैठक आज सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत एनडीएचे नेते आणि खासदार उपस्‍थित राहतील. या शिवाय भाजपशासीत राज्‍यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्‍थित राहणार आहेत.

हेही वाचा :   

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news