Sunita Williams : अंतराळात पोहोचल्‍यावर सुनीता विल्‍यम्‍स यांनी आनंदाने मारल्‍या उड्या; सहकाऱ्यांची घेतली गळाभेट

Sunita Williams
Sunita Williams

पुढारी ऑनालाईन : सुनीता विल्यम्स यांनी सर्वप्रथम श्री गणेशाची मर्ती आणि भगवद्गगीता अंतराळात नेली आहे. त्यांचा हा तिसरा अंतराळातील प्रवास आहे. जेंव्हा त्‍या स्पेस स्टेशनवर पोहोचल्या तेंव्हा त्‍या खास अंदाजात दिसल्‍या.

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी बुधवारी (दि.५) तिसऱ्यांदा अंतराळात यशस्वी उड्डाण केले. सुनिता आणि त्यांच्या एका सहकाऱ्याने बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानातून यशस्वी उड्डाण केले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य बनून सुनिता विल्यम्स यांनी नवीन इतिहास (Sunita Williams) रचला आहे.

भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि तिचा जोडीदार बुच विल्मोर हे दोघे (गुरुवार) सुरक्षितपणे अंतराळात पोहोचले. यावेळी विल्यम्स आनंदाने उड्या मारताना दिसले. तर सुनीताही आनंदीत झाल्‍याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बोईंगच्या स्टार्लाइनर अंतराळयानातून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) च्या मार्गावर अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि तिच्या सहकारी बुच विल्मोर यांनीही उड्डाण क्षमतेची (मॅन्युअल पायलटिंग) चाचणी केली. या दोघांनी स्वतःचे सदस्य म्हणून अवकाशयानाचा ताबा घेऊन इतिहास रचला. अशी कामगिरी करणाऱ्या सुनीता या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

अंतराळयान सामान्यतः ऑटो असते, परंतु सुमारे दोन तासांच्या ऑटो फ्लाइट दरम्यान क्रूने स्वतः अंतराळ यानाचा ताबा घेतला. त्यांनी स्टारलाइनरला पृथ्वीच्या दिशेने निर्देशित केले जेणेकरुन सर्व्हिस मॉड्युलच्या मागे असलेला त्याचा संप्रेषण अँटेना ट्रॅकिंग आणि डेटा रिले उपग्रहांकडे निर्देशित करू शकेल. त्यानंतर त्यांनी अंतराळयान सूर्याकडे वळावे अशा प्रकारे फिरवले जेणेकरून गरज पडल्यास ते अंतर्गत बॅटरी चार्ज करू शकतील. तीनही फ्लाइट कॉम्प्युटर एकाच वेळी बंद पडल्यास ते अंतराळात काम करू शकतात हे दाखवण्याचा या संपूर्ण सरावाचा उद्देश होता. त्यांनी स्वहस्ते अंतराळयानाचा वेग वाढवला आणि नंतर त्याचा वेग कमी केला जेणेकरून आवश्यक असल्यास क्रू स्पेस स्टेशनच्या कक्षेपासून वेगळे होऊ शकेल.

गणेश मूर्ती, भगवद्गीता आणि आता हे विशेष

विल्यम्सने यापूर्वी गणेशाची मूर्ती आणि भगवद्गीता अंतराळात नेली आहे. आता त्याचा हा तिसरा अवकाश प्रवास आहे. स्पेस स्टेशनवर पोहोचल्यावर सुनीता याका खास शैलीत दिसल्‍या. अंतराळात पोहोचताच त्‍या आनंदाने उड्या मारतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी त्यांनी आयएसएसवर असलेल्या इतर सात अंतराळवीरांची गळाभेट घेतल. तसेच आनंदात त्‍यांनी नृत्‍यही केले.

बेल वाजवून स्वागत

विल्यम्स आणि विल्मोर यांचे घंटा वाजवून स्वागत करण्यात आले, ही एक जुनी ISS ची परंपरा आहे. तर, तिच्या डान्सवर सुनीता म्हणाल्‍या की प्रवास पुढे सुरू ठेवण्याचा तो एक मार्ग आहे.

असे करणारी जगातील पहिली महिला अंतराळवीर ठरली

बोईंग स्टारलाइनरचे उड्डाण विविध कारणांमुळे अनेकदा विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. अखेरीस, हे यान फ्लोरिडातील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून प्रक्षेपित करण्यात आले. सुनीता विल्यम्स अशा मोहिमेवर जाणारी जगातील पहिली महिला अंतराळवीर ठरली आहे. मे 1987 मध्ये सुनीताने यूएस नेव्हल अकादमीतून प्रशिक्षण घेतले. यानंतर ती अमेरिकन नौदलात रुजू झाली. 1998 मध्ये त्यांची नासाने अंतराळवीर म्हणून निवड केली. यापूर्वी सुनीता विल्यम्स 2006 आणि 2012 मध्ये अंतराळ मोहिमेचा भाग होत्या.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news