पुढारी ऑनलाईन डेस्क : आपण एसटी आणि रेल्वेतील भुरट्या चोरट्याबद्दल वाचलं आणि ऐकलं असेल. काहींनी प्रत्यक्ष मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचा अनुभवही घेतला असेल;पण जेव्हा आपण विमान प्रवास म्हणतो, तेव्हा सारं काही उच्चभ्रू वातावरण, कडेकोट सुरक्षा अशी कल्पना करतो. त्यामुळे हवाई प्रवासात चोरी तशी दुर्मिळ घटना वाटते; पण ११० दिवसांमध्ये तब्बल २०० पेक्षा अधिकवेळा हवाई प्रवास करत कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणार्या चोरट्याला दिल्ली पोलिसांनी जेरबंद केले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, चोरटा राजेश कपूर हा हवाई प्रवासात चोरी करायचा. यासाठी त्याने ११० दिवसांमध्ये २०० हून अधिकवेळा देशातंर्गत हवाई प्रवास केला. यामध्ये सर्वाधिकवेळा चंदीगड आणि हैदराबादाला त्याने हवाई प्रवास केला. तो हवाई प्रवासातील ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करत असे. ११० दिवसांमध्ये त्याने सहप्रवाशांच्या बॅगेजमधील कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला मारला. त्याने पश्चिम दिल्लीतील एका ज्वेलर्सला सोन्याचे दागिणे विकेल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
दिल्ली पोलिस उपायुक्त (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ) उषा रंगनानी यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की, चोरटा राजेश कपूर हा ओव्हरहेड बॅगेज डब्यांमधून पळ काढला होता. प्रवासात विश्रांती घेत असलेल्या प्रवाशांनी जाग येण्यापूर्वीच तो खुल्या बॅगमधून मौल्यवान वस्तू चोरल्या. एअरलाइन्स आणि कायद्याच्या अंमलबजावणीला चकमा देण्यासाठी राजेश त्याचा मृत भाऊ ऋषी कपूर यांच्या नावाने तिकीट बुक करत असे. त्याच्या भावाचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले आहे.
दोन प्रवाशांनी त्यांच्या केबिनच्या सामानातून लाखोंचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दिली. राजेश कपूर त्याच्या विरोधात पहिली तक्रार या वर्षी 2 फेब्रुवारी रोजी युनायटेड स्टेट्समधील रहिवासी वरिंदरजीत सिंग यांनी दाखल केली होती, त्यांनी विमानाने अमृतसर ते दिल्ली प्रवास केला होता, ते जर्मनीला जाणार होते. दिल्लीच्या प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगेतून २० लाखांचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी 11 एप्रिल रोजी दुसरा गुन्हा दाखल झाला होता. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी दिल्ली, अमृतसर आणि हैदराबाद विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली. यावेळी त्यांना संबंधित दोन्ही फ्लाइटमध्ये प्रवास केलेली एक व्यक्ती दिसली.
राजेशने तिकीट काढण्यासाठी वापरलेला फोन नंबर त्याचा नव्हता, असे तपासात आढळून आले आहे. दरम्यान, पोलिसांनी कपूरचा शोध सुरू केला. त्याला पहाडगंज, दिल्ली येथून अटक केली. येथे तो गेस्ट हाऊस चालवत होता.पोलिस आयुक्त रंगनानी म्हणाले की, कपूरच्या चौकशीत या दोन गुन्ह्यांव्यतिरिक्त गेल्या चार महिन्यांत इतर तीन चोरींमध्येही त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. यातील दोन घटनांमध्ये 62.5 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. यापैकी दोन गुन्ह्यांची नोंद आयजीआय विमानतळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, तर पाचवा गुन्हा हैदराबादमध्ये दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपूर हा सुमारे २० वर्षांपासून चोरी करत आहे. पूर्वी तो ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटायचा.
हेही वाचा :