पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कंगाल झाल्याचे सर्वश्रुत आहेच. या देशातील वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे संघर्षपूर्ण झाले आहे. आता वाढत्या महागाईमुळे या देशातील खासदारांचे बुटही सुरक्षित नसल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. आर्थिक दृष्ट्या रसातळाला गेलेल्या देशातील चोरट्यांनी थेट खासदारांच्या बूटांवरच डल्ला मारला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पाकिस्तान संसदेच्या सभापतींना चौकशीचे आदेश दिले आहेत, असे वृत्त 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'ने दिले आहे.
संसद भवन परिसरातीलमशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी ही घटना उघडकीस आली, येथे संसद सदस्य , पत्रकार आणि संसदीय कर्मचारी यांच्यासह भाविक जमले होते. चोरट्यांनी संसद परिसरातून खासदारांच्या बुटांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला. नॅशनल असेंब्लीचे सदस्य (MNA), पत्रकार आणि संसदीय कर्मचार्यांना त्यांचे जोडे गायब झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर खासदारांना अनवाणी घरी जाण्यास भाग पाडले. पाकिस्तानच्या संसदेच्या संकुलातून चपला गूढपणे गायब झाल्याने सुरक्षा कर्मचार्यांनींही आश्चर्य व्यक्त केले असल्याचे या वृत्तात म्हटलं आहे.
चोरट्यांनी २० हून अधिक बूट जोड्यांवर डल्ला मारल्याची माहिती समोर आली आहे. खासदारांना अनवाणी घरी परत जावे लागले. नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनी सुरक्षेतील त्रुटींबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सभापीतंच्या निर्देशानुसार आता पाकिस्तान संसद संयुक्त सचिव या प्रकरणाची चौकशी करतील. संसद भवन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा :