Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक: चौथ्या टप्प्यात दुपारी ३ पर्यंत ५२.६० टक्के मतदान

Lok Sabha Election 2024,
Lok Sabha Election 2024,

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशात आज (दि.१३) लोकसभा मतदानाचा चौथा टप्पा पार पडत आहे. 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ९६ जागांवर मतदान प्रक्रिया (Lok Sabha Election 2024) सुरू आहे. दरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण 52.60% मतदान झाले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी ३ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 66.05 टक्के तर जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वात कमी 29.93 टक्के मतदान (Lok Sabha Election 2024) झाल्याचे देखील एएनआयने वृत्तात म्हटले आहे.

Lok Sabha Election 2024: चौथ्या टप्प्यात दुपारी ३ वाजेपर्यंतची आकडेवारी

  • आंध्र प्रदेश- 55.49%
  • बिहार- 45.23%
  • जम्मू आणि काश्मीर – 29.93%
  • झारखंड- 56.42%
  • मध्य प्रदेश- 59.63%
  • महाराष्ट्र- 42.35%
  • ओडिशा- 52.91%
  • तेलंगणा- 53.34%
  • उत्तर प्रदेश- 48.41%
  • पश्चिम बंगाल- 66.05%
  • आंध्र प्रदेश (विधानसभा निवडणूक)- 55.49%
  • ओडिशा (फेज 1 विधानसभा निवडणूक)- 52.91%

हेही वाचा: 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news