PM-Kisan Samman Nidhi : पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता कधी मिळणार? ‘या’ दिवशी होऊ शकतो जारी | पुढारी

PM-Kisan Samman Nidhi : पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता कधी मिळणार? 'या' दिवशी होऊ शकतो जारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पीएम किसान योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आतापर्यंत १६ हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. २८ फेब्रुवारी रोजी १६ व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात आली. आता किसान सन्मान निधीच्या १७ व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहेत.

पीएम किसानचा १७ वा हप्ता कधी येणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर १७ वा हप्ता जमा होऊ शकतो. मात्र पीएम किसानचा (PM Kisan Yojana) पुढचा हप्ता कधी येईल याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

पीएम किसान योजनेचे ठळक मुद्दे

  • पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये जारी केला होता.
  • त्यावेळी ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना २१ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जारी करण्यात आली.
  • मे महिन्याच्या अखेरपर्यंत १७ वा हप्ता जारी होऊ शकतो.
  • पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी २ हजार रुपये मिळतात.
  • ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार.

शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांचा आर्थिक लाभ

केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू आहे. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाली. या अंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांना एकाच वेळी ६ हजार रुपये देत नाही तर २ हजार रुपयांच्या ३ समान हप्त्यांमध्ये देते.

पुढील हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य

जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी e-KYC करणे अनिवार्य आहे. e-KYC केली नसेल तर आजच पूर्ण करा, न केल्यास तुम्हाला पीएम किसान सन्मान योजनेच्या १७ व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते.

हेही वाचा : 

Back to top button