

पुढारी ऑनलाईन डेस्क : ईशान्य भारतातील लोक चिनीसारखे दिसतात. दक्षिण भारतीय हे आफ्रिकन लोकांसारखे आहेत आणि उत्तर भारतीय काहीसे गोरे आहेत, असे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ववारसा कर विषयी आपले मत मांडले होते. यावेळी काँग्रेसने त्यांच्या हे व्यक्तिगत मत असल्याचे म्हटलं होते. यानंतर आता त्यांनी भारतातील विविधता सांगताना पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधकांना काँग्रेसला घेरण्यासाठी नवा मुद्दा मिळला आहे.
सॅम पित्रोदांनी एका माध्यम समुहाशी बोलताना भारतीयांच्या दिसण्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. ते म्हणाले की, ईशान्य भारतातील लोक चिनीसारखे दिसतात. दक्षिण भारतीय हे आफ्रिकन लोकांसारखे आहेत. तर उत्तर भारतीय काहीसे गोरे आहेत. आतापर्यंत जशी विविधतेत एकता आहे तशीच आपण टिकवून ठेवू शकतो.
'भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला आपण एकत्र ठेवू शकतो. पूर्व भारतातील लोक चीनसारखे दिसतात. पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक गोरे दिसतात आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात. काही फरक पडत नाही. आपण सर्व एक भावा-बहिणी आहोत. भारतातील लोक भाषिक, धार्मिक आणि खाद्य विविधतेचा आदर करतात, जी प्रत्येक प्रदेशानुसार बदलते. माझा फक्त या भारतावर विश्वास आहे. जिथे प्रत्येक नागरिकासाठी स्थान आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने जीवन जगण्याची संधी मिळते. भारताच्या लोकशाही, स्वातंत्र्य आणि उदारतेच्या कल्पनेला आज राम मंदिरामुळे आव्हान दिले जात आहे, असा दावाही त्यांनी केला.
पंतप्रधान अनेकदा केवळ मंदिरांना भेट देतात. ते केवळ राष्ट्रीय नेत्यासारखे बोलत नाहीत तर भाजपच्या नेत्याप्रमाणे चर्चाही करतात, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
सॅम पित्रोदा यांच्या मुलाखतीची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, 'सॅम भाई, मी ईशान्येचा आहे आणि भारतीय दिसतो. आम्ही विविधतेवर विश्वास ठेवतो. आपण भिन्न दिसू शकतो, परंतु आपण सर्व एक आहोत. आपल्या देशाबद्दल थोडे समजून घ्या.
हेही वाचा :