PM Kisan Yojana : देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर किसान सन्मान योजनेचा १६ वा हप्ता जमा | पुढारी

PM Kisan Yojana : देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर किसान सन्मान योजनेचा १६ वा हप्ता जमा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १६ वा हप्ता (PM Kisan Yojana 16th Installment) आज (दि.२८) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथून किसान सन्मान निधी अंतर्गत देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २१ हजार कोटी रूपये जमा केले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सुमारे ६ हजार ९०० कोटी रूपयांचे वितरण केले. तसेच राज्यातील ५ हजार कोटी रूपयांच्या रस्ते, रेल्वे आणि सिंचन प्रकल्पाचे उद्घाटनही त्यांनी केले.

केंद्र सरकारने २०१९ मध्ये शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना हप्त्याच्या आधारे वार्षिक ६ हजार रुपये मिळतात. बुधवारी पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये येतात. सरकार ही रक्कम सीबीडीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते.

PM Kisan Yojana : ‘या’ शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही

सध्या या योजनेचा लाभ कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र, यावेळीही अनेक शेतकरी वंचित राहीले आहेत. सरकारने पीएम किसान योजनेत ई-केवायसी आणि जमीन पडताळणी अनिवार्य केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी आणि जमीन पडताळणी केलेली नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. OTP द्वारे शेतकरी सहजपणे ई-केवायसी ऑनलाइन करू शकतात. त्याचबरोबर जमीन पडताळणीसाठी कागदपत्रे सहज ऑनलाइन अपलोड करता येतील.

हेही वाचा : 

Back to top button