कोल्हापूर : सोनारवाडीतील ५० हुन अधिक नागरिक मतदानापासून वंचित | पुढारी

कोल्हापूर : सोनारवाडीतील ५० हुन अधिक नागरिक मतदानापासून वंचित

गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : मतदार यादीत नावे नसल्याने भुदरगड तालुक्यातील सोनारवाडी येथील ५० हून अधिक नागरिकांना  मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे या संतप्त नागरिकांनी निवडणूक विभागाचा निषेध केला आहे.

सोनारवाडीतील ५० हून अधिक नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट नसल्यामुळे ग्रामस्थांनी मतदानाच्या हक्कासाठी संताप व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली. या‌ नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमून जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका पोलीस पाटील यांनाही बसला आहे.

यावेळी मतदानापासून वंचित राहिलेल्या सात्तापा कल्याणकर, हरीदास राणे, धोंडीराम सावंत, अशोक-हाटवळ यांनी निवडणूक कामकाजाबाबत निषेध व्यक्त केला. यावेळी एस. एम. पाटील, जयवंत पाटील, महादेव नार्वेकर, सदाशिव देवर्डेकर, धोंडीराम-हाटवळ, रमेश माने आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button