इस्‍लामपूर विधानसभा मतदारसंघात दुपारी १२ वाजेपर्यंत २७ टक्‍के मतदान | पुढारी

इस्‍लामपूर विधानसभा मतदारसंघात दुपारी १२ वाजेपर्यंत २७ टक्‍के मतदान

इस्लामपूर : पुढ‍ारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीसाठी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. अनेक भागात मतदारांच्यात फारसा उत्साह दिसून येत नव्हता. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत केवळ २७ टक्केच मतदान झाले होते. मतदान प्रक्रिया शांततेत सुरु आहे.

इस्लामपूर मतदार संघात २८४ मतदान केंद्रावर मतदान सुरु आहे. महायुतीचे धर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील व अपक्ष अमेदवार राजू शेट्टी यांच्यात चुतशीची तिरंगी लढत होत आहे. यामुळे मतदारांना बाहेर काढण्यासाठी तिन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते प्रयत्न करीत होते. मात्र कडक उन्हामुळे तसेच मतदारांच्यात फारसा नसणारा उत्साह यामुळे मतदानाची अपेक्षित टक्‍केवारी वाढताना दिसत नव्हती.

सकाळी ९ वाजेपर्यंत ७ टक्के तर ११ वाजेपर्यंत २१. ७० टक्के मतदान झाले होते. १२ वाजेपर्यंत हा आकडा २७ टक्क्यावर पोहोचली आहे. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मतदान प्रक्रिया शांततेत सुरु आहे.

हेही वाचा : 

Back to top button