Jammu And Kashmir
Latest
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार
पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये आज (दि.७) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलांनी या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा कुलगामच्या रेडवानी गावात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती.
सुरनकोट ते जारनवाली गलीपर्यंत शोधमोहीम तीव्र करण्यात आली असून परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी शनिवारी (दि. ४) हवाई दलाच्या ताफ्याला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात भारतीय वायुसेनेचे अधिकारी विक्की पहाडे हे शहीद झाले तर आणखी चार जवान जखमी झाले आहेत. हवाई दलाच्या ताफ्यावर गोळीबार करणारे हेच दहशतवादी होते की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
हेही वाचा :

