ब्रेकिंग : केजरीवालांच्‍या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ | पुढारी

ब्रेकिंग : केजरीवालांच्‍या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी प्रकरणी अटकेत असलेले मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ करण्‍यात आली आहे.

मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी केजरीवाल यांची न्‍यायालयीन कोठडीची मुदत आज संपली. राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी ही मुदत २० मेपर्यंत वाढवली. दरम्यान, केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

काय म्‍हणाले होते दिल्‍ली उच्‍च न्‍यायालय ?

दिल्‍ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ( Delhi liquor policy case) ९ एप्रिल रोजी दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाच्‍या एकल खंडपीठाच्‍या न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी केजरीवालांची याचिका फेटाळली होती. अटकेची कारवाई करण्‍यासाठी आवश्‍यक असणारे  पुरेसे पुरावे ईडीकडे होते. त्‍यामुळेच त्यांनी केजरीवाल यांना अटक केली. राजकीय कारणे न्यायालयासमोर आणता येत नाहीत. या न्यायालयासमोरील प्रकरण हा केंद्र सरकार आणि केजरीवाल यांच्यातील संघर्षाचा नाही. तर केजरीवाल आणि ईडी यांच्यातील प्रकरण आहे. सामान्य नागरिकांसाठी एक आणि मुख्यमंत्र्यांसाठी विशेष विशेषाधिकार असे हे न्यायालय करणार नाही.  न्यायाधीश हे कायद्याने बांधील असतात, राजकारणाने नाही. न्यायनिवाडे कायदेशीर तत्त्वांनुसार लिहिलेले असतात, असेही न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी स्‍पष्‍ट केले होते.

काय होते दिल्‍लीतील नवीन मद्य धोरण?

22 मार्च 2021 रोजी दिल्‍लीचे तत्‍कालीन उपमुख्‍यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्‍लीसाठी नवीन दारू धोरण जाहीर केले होते. 17 नोव्हेंबर 2021 रोजी नवीन मद्य धोरण म्हणजेच उत्पादन शुल्क धोरण 2021-22 लागू करण्यात आले. हे धोरण आल्यानंतर दिल्‍ली. सरकारचे दारू दुकानांवरील नियंत्रण खासगी यंत्रणेच्‍या हाती गेले. दारु व्‍यवसायातील माफिया राजवट संपेल आणि सरकारचा महसूल वाढेल, असा सरकारचा अंदाज होता. मात्र हे नवीन धोरण सुरुवातीपासूनच वादात राहिले. गोंधळ वाढल्यावर 28 जुलै 2022 रोजी सरकारने नवीन दारू धोरण रद्द करून जुने धोरण पुन्हा लागू केले होते.

केजरीवालांची रवानगी तिहार कारागृहात

अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीने त्याची ED कोठडी संपल्यानंतर १ एप्रिल रोजी सत्र न्‍यायालयाने त्‍यांची रवनागी न्यायालयीन कोठडीत केली.  केजरीवालांची रवानगी तिहार कारागृहात झाली आहे.

 

Back to top button