पेट्रोल ३४ पैशांनी महागले; मे महिन्यापासून ४० वेळा इंधन दरवाढ | पुढारी

पेट्रोल ३४ पैशांनी महागले; मे महिन्यापासून ४० वेळा इंधन दरवाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील तेल कंपन्यांकडून पुन्हा एकदा दंधनाचे दर वाढवण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर होते.

गुरूवारी पेट्रोलच्या दरात ३४ पैसे तर, डिझेलच्या दरात १५ पैशांची वाढ करण्यात आली. मे महिन्यापासून आतापर्यंत तब्बल ४० वेळा इंधनदरात वाढ नोंदवण्यात आली. देशातील मेट्रो शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे.

अधिक वाचा :

तर, डिझेलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर  पोहचले आहेत. जुलै महिन्यात पेट्रोलचे दर ८ वेळा तर डिझेलचे दर ५ वेळा वाढवण्यात आले.

देशातील विविध ​भागांमध्ये इंधनाचे दर हे आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर पोहचले आहेत. देशातील १७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे.

पेट्रोल ३४ पैशांनी महागले
पेट्रोल ३४ पैशांनी महागले

राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, लडाख, कर्नाटक, जम्‍मू कश्‍मीर, ओडिशा, तमिलनाडू, बिहार, केरल, पंजाब, सिक्किम, पॉन्डेचेरी , दिल्ली तसेच  पश्चिम बंगालचा त्यात समावेश आहे. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल, डिझेलचे दर तेल कंपन्यांकडून जाहीर केले जातात.

अधिक वाचा :

पेट्रोल, डिझेलच्या दरावर एक्साईज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टींचा प्रभाव होत असतो त्यामुळे प्रत्येक ठिकाणी इंधनाचे दर वेगवेगळे असतात.

मे महिन्यापासून आतापर्यंत तब्बल ४० वेळा इंधनदरात वाढ नोंदवण्यात आली
मे महिन्यापासून आतापर्यंत तब्बल ४० वेळा इंधनदरात वाढ नोंदवण्यात आली

प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर         पेट्रोल         डिझेल

१) दिल्ली        १०१.५४ ₹    ८९.८७₹
२) मुंबई          १०७.५४₹    ९७.४५₹
३) कोलकाता   १०१.७४₹     ९३.०२₹
४) चेन्नई           १०२.२३₹    ९४.३९₹

Back to top button