Bitcoin : बिटकॉईनला चलनाच्या स्वरूपात परवानगी देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, अर्थमंत्री सीतारामन यांची लोकसभेत माहिती | पुढारी

Bitcoin : बिटकॉईनला चलनाच्या स्वरूपात परवानगी देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, अर्थमंत्री सीतारामन यांची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

बिटकॉईनला ( Bitcoin ) चलनाच्या स्वरूपात परवानगी देण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Nirmala Sitharaman ) यांनी सोमवारी लोकसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली. सर्व प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालत असतानाच देशाचे स्वतःचे डिजिटल चलन आणण्याचा सरकारचा निर्धार आहे. यासंदर्भात संसदेच्या चालू अधिवेशनात एक विधेयक आणले जाणार असल्याचे सरकारने याआधीच स्पष्ट केलेले आहे.

डिजिटल चलनांच्या वापरावर प्रतिबंध घालण्याचा अनेक देशांचा प्रयत्न आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. बिटकॉईन देवाण-घेवाणीची आकडेवारी सरकारकडे आहे का? असा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आला होता. त्यावर अशी कोणतीही माहिती सरकार जमा करीत नसल्याचे उत्तरादाखल सांगण्यात आले. बिटकॉईनला ( Bitcoin ) चलनाच्या स्वरूपात मान्यता देण्याचा प्रस्ताव नसल्याचेही सरकारने नमूद केले आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button