

पुढारी ऑनलाईन : महिला खासदारांसमवेत फोटो ट्विट केल्याने काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यावर टीका होत आहे. या टीकेनंतर थरूर यांनी ट्वीट करत आपला माफीनामा सादर केला .
फोटोसोबत थरूर यांनी केलेली टिप्पणी ही महिलाविरोधी असल्याची टीका ट्विटरवर सुरू झाली होती.
शशी थरूर यांनी आज महिला खासदार सुप्रिया सुळे, नुसरत जहाँ, मिमी चक्रबर्ती, ज्योतीमनी, तमीझाची थंगपांडिया या महिला प्रतिनिधींनी शशी थरूर यांच्यासोबत एक सेल्फी घेतली. ही सेल्फी थरूर यांनी स्वतःच्या ट्विटरवर शेअर केली. त्यासोबत 'कोण म्हणतं, संसद काम करण्यासाठी आकर्षक जागा नाही,' अशी टिप्पणीही केली. त्यानंतर थरूर यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला.
महिलांचे काम हे त्यांच्या सौंदर्यावरून ठरवलं जाते, हेच थरूर यांचं मत असेल, अशा प्रकारच्या टीका त्यांच्यावर सुरू झाल्या. थरूर यांनी यावर माफी मागितली. तसेच या महिला खासदारांनी सेल्फी घेतली आणि मला शेअर करण्याची विनंती केली, असं त्यांनी म्हटलं आहे.