नागरिकांना सुरक्षितपणे ओलांडता येणार रस्ता | पुढारी

नागरिकांना सुरक्षितपणे ओलांडता येणार रस्ता

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

निगडीतीत पादचारी भुयारी मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू

निगडीतील भक्ती-शक्ती समुहशिल्प चौक ते निगडीच्या टिळक चौकापर्यंतच्या उड्डाणपुल सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी पादचार्‍यांसाठी भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. त्यांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच पादचार्‍यांना भुयारी मार्गाची सुविधा उपलब्ध होईल.

अश्विनचा विक्रम, कसोटी विकेट्सच्या यादीत हरभजनला टाकले मागे

शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यापारी, प्रवासी, कामगार आदींना भक्ती-शक्ती उड्डाणपूल ओलांडून जाण्यासाठी खूप लांबचा वळसा मारून ये-जा करावी लागत होती. तसेच, काही नागरिक जीव धोक्यात घालून उड्डाणपुल व रस्ता ओलांडत होते.त्यामुळे लहान-मोठे अपघात झाले आहेत.

या ठिकाणी पादचार्‍यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग विकसित करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी पालिकेकडे वारंवार केली होती. त्यासाठी रास्ता रोको आंदोलनही केले होते. तसेच, स्थानिक नगरसेवक व व्यापारी संघटनेने ती मागणी लावून धरली होती. तसेच, ‘पुढारी’ने हा मुद्दा लावून धरला होता.

पिंपरी : शहरातून खाजगी वाहने सुसाट

त्यांची दखल घेऊन आयुक्त राजेश पाटील यांनी पादचारी भुयारी मार्गास मान्यता दिली असून, त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, पालिकेच्या 31 मार्चच्या सर्वसाधारण सभेत प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे. त्यानंतर पालिकेच्या बीआरटीएस विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले.

रजनी पाटील यांनी घेतली मराठीत शपथ

कामाचे अंदाजपत्रक करून, आराखडा तयार करण्यात आला. तांत्रिक मान्यता घेऊन निविदा राबविण्याची प्रक्रिया बीआरटीएस विभागाने सुरू केली आहे. वर्षभराच्या आत भुयारी मार्ग तयार होईल, असे बीआरटीएस विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

Back to top button