दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीचे नववे समन्स | पुढारी

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीचे नववे समन्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी (Delhi liquor scam) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा एकदा समन्स पाठवले आहे. ईडीने समन्स पाठवण्याची ही ९ वी वेळ आहे. त्यांना २१ मार्चला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वीच्या समन्सवर हजर न झाल्याच्या प्रकरणात शनिवारीच त्यांना जामीन मिळाला.

ईडीने २ नोव्हेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना पहिले समन्स पाठवले होते, परंतु ते हजर झाले नाहीत. यानंतर, त्यांना २१ नोव्हेंबर, ३ जानेवारी, १८ जानेवारी, २ फेब्रुवारी, १९ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी आणि ४ मार्च रोजी आठवे समन्स पाठवले. मात्र केजरीवाल कोणत्याही समन्सवर हजर झाले नाहीत. त्यांनी (CM Arvind Kejriwal) केंद्र सरकार ईडीचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button