पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून (दि.८) ईशान्य भारताच्या दौऱ्यावर आहेत. आज (दि.९) त्यांनी ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यात १८ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण केले. अरुणाचलमधील इटानगर येथे आयोजित 'विकसित भारत विकसित नॉर्थ ईस्ट' या कार्यक्रमात त्यांनी याविकास प्रकल्पांचे उद्धाटन आणि पायाभरणी केली. यावेळी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधानांनी आज सकाळी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीचा आनंदही घेतला. (PM Narendra Modi)
पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ मार्च ते १० मार्च रोजी ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांना भेटी देणार आहेत. इटानगर (अरुणाचल) येथील कार्यक्रमादरम्यान ते सेला बोगदा राष्ट्राला समर्पित करतील आणि सुमारे १०,००० कोटी रुपयांच्या UNNATI योजनेचा देखील शुभारंभ करतील. तसेच यामध्ये बरौनी ते गुवाहाटी पाईपलाईनचा ३,९९२ कोटी रुपयांचा प्रकल्पही समाविष्ट आहे. (PM Narendra Modi)
ईशान्य भारतातील दौऱ्यादरम्यानच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे ५५,६०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. (PM Narendra Modi)
हेही वाचा: