लालू प्रसाद यादवांच्‍या निकवटर्तींवर ‘ईडी’चा छापा | पुढारी

लालू प्रसाद यादवांच्‍या निकवटर्तींवर 'ईडी'चा छापा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारचे माजी मुख्‍यमंत्री व राष्‍ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्ती सुभाष यादव त्‍यांच्‍या निवासस्‍थानांसह अन्‍य मालमत्तांवर सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) आज (दि. ९मार्च) सकाळी  छापे टाकले. एकाचचेळी ही कारवाई करण्‍यात आल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बिहार दौऱ्यापूर्वी ही कारवाई झाल्‍याने बिहारमधील राजकारण चांगलेच तापले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज पाटणा येथे सभा होणार आहे. यापूर्वी आज सकाळी ईडीने सुभाष यादव यांच्या निवासावर छापा टाकला. यादव यांच्या पाटणा येथील निवासस्‍थानाजवळ सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. येथे कोणत्‍याही बाहेरच्या व्यक्तीला आत प्रवेश दिला जात नाही. सुभाष यादव यांच्यावर अवैध वाळू उत्खननाचा आरोप आहे.

Back to top button